Vijay Wadettiwar on IAS Officer Transfer : राज्यातील महायुतीचं सरकार भ्रष्टाचाराला विरोध करणाऱ्या सनदी अधिकाऱ्यांना बदलीची शिक्षा देत असल्याचा गंभीर आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर यांनी केला आहे. भ्रष्ट महायुतीच्या भ्रष्ट कार्यपद्धतीचा प्रामाणिक अधिकाऱ्यांना फटका बसत असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं आहे. वडेट्टीवार यांच्यासह काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारच्या कारभारावर जोरदार हल्लाबोल केला. वडेट्टीवार म्हणाले, “राज्याच्या कृषी विभागातील भ्रष्टाचाराला विरोध करणाऱ्या प्रधान सचिव व्ही. राधा यांची भ्रष्ट महायुती सरकारने बदली केली आहे. भ्रष्टाचार रोखला तर बदलीची शिक्षा मिळेल, असा संदेश या बदलीतून महायुतीने सर्व सनदी अधिकाऱ्यांना दिला आहे.”

वडेट्टीवार यांनी याबाबत एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की महायुती सरकारचा प्रामाणिक अधिकाऱ्यांना इशारा… भ्रष्टाचार रोखला तर बदलीची शिक्षा मिळेल! भ्रष्टाचाराला विरोध करणाऱ्या सनदी अधिकाऱ्यांना बदलीची शिक्षा… भ्रष्ट महायुतीच्या भ्रष्ट कार्यपद्धतीचा प्रामाणिक अधिकाऱ्यांना फटका… कृषी विभागातील भ्रष्टाचाराला विरोध करणाऱ्या प्रधान सचिव व्ही. राधा यांची भ्रष्ट महायुती सरकारने बदली केली आहे. भ्रष्टाचार रोखला तर बदलीची शिक्षा मिळेल, असा स्पष्ट संदेश त्यांनी या बदलीतून महायुतीने दिला आहे.

Supriya Sule On Ajit Pawar
Supriya Sule : सुप्रिया सुळेंचं अजित पवारांबाबत मोठं विधान; म्हणाल्या, “भावाने मागितलं असतं तर पक्ष आणि चिन्ह…”
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
Rajiv Kumar on Maharashtra Assembly Election Date Schedule in Marathi
Maharashtra Assembly Election : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाच्या आयुक्तांचं मोठं विधान, म्हणाले…
Prithviraj Chavan News
Prithviraj Chavan : “सहानुभूतीचा विषय संपला, दिल्ली दौरा केला तरीही..”; पृथ्वीराज चव्हाण यांचं उद्धव ठाकरेंबाबत वक्तव्य
Supriya Sule, tuljapur, ladki bahin yojana
लोकसभेच्या अपयशामुळेच लाडकी बहीण योजना, शिवस्वराज्य यात्रेत सुप्रिया सुळे यांची राज्य सरकारवर टीका
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
Amol mitkari jaydeep apte 1
Amol Mitkari : “जयदीप आपटे याचा त्या पुतळ्याद्वारे छुपा अजेंडा…”, मिटकरींचे गंभीर आरोप; देवेंद्र फडणवीसांना म्हणाले…
Ajit Pawar On Sharad Pawar
Ajit Pawar : “मी आता ठरवलंय, शरद पवारांबाबत…”, अजित पवार नेमकं काय म्हणाले?

वडेट्टीवार म्हणाले, प्रामाणिक अधिकाऱ्यांचे मनोबल खच्ची करण्याची या सरकारची कार्यपद्धती जुनीच आहे. कृषी विभागातील भ्रष्टाचाराला आळा घालून शेतकऱ्यांचं भलं करण्याची या सरकारची मानसिकता नाही. शेतकरी विरोधी सरकार असल्यानेच महायुतीचा कृषी विभाग भ्रष्टाचाराच्या गर्तेत अडकला आहे. नॅनो युरिया व नॅनो डीएपी वाटपाच्या १,४०० कोटी रुपयांच्या प्रस्तावावर राधा यांनी आक्षेप नोंदवला होता. खतांच्या खरेदीसाठी ‘पीएम प्रणाम’ योजनेतंर्गत मिळणारे अनुदान हे २५० कोटींपेक्षा जास्त मिळणार नसल्याने ही योजना तूर्तास राबवली जाऊ नये, असं मत राधा यांनी व्यक्त केलं होतं.

हे ही वाचा >> Sanjay Raut : “अनिल देशमुख आणि मी जेलमध्ये खिमा पाव बनवायचो”, राऊतांनी सांगितली तुरुंगातील दिनचर्या; कसाबच्या वस्तू पाहून म्हणाले…

कृषीमंत्र्यांच्या जिल्ह्यातच सर्वाधिक आत्महत्या : वडेट्टीवार

वडेट्टीवार म्हणाले, शेतकरी सन्मान योजनेच्या निधीचा एक हप्ता वळवण्यासही विरोध होता. या योजनेतील १,४०० कोटी वळवण्याला त्यांनी विरोध केला. तरी मंत्री कार्यालयाचा निधी वळवण्याचा अट्टाहास होताच. राधा यांनी निविदा खरेदीच्या प्रस्तावाचा दुसरा टप्पाही रोखला होता. फवारणी पंपाच्या खरेदीवर अनेक आक्षेप घेतले होते. यात अनियमितता असून चौकशी करण्याची आवश्यकता असल्याचा शेरा राधा यांनी संबंधित फाईलवर मारल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महायुती सरकारने व्ही. राधा यांची बदली केली आहे. कृषिमंत्र्यांच्या जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्या होत आहेत. हे दुर्दैव असून कृषी खात्यातील वाढलेला भ्रष्टाचार राज्याला डबघाईला आणणारा आहे.