एकनाथ शिंदे गटाचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना अज्ञात व्यक्तीने फोन कॉलद्वारे जीवे मारण्याची धमकी दिली आहे. तसा दावा विकास गोगावले यांनी केला आहे. या फोन कॉलनंतर विकास गोगावले यांनी मुंबईतील वागदेवी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा >> मंत्रिमंडळ विस्तार नेमका कधी? सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितली नवी तारीख

BJP tukde-tukde gang Kanhaiya Kumar interview delhi lok sabha election
“मी तुकडे-तुकडे गँगचा असेन तर मोदी मला अटक का करत नाहीत?”; कन्हैयाचं भाजपाला आव्हान
solapur lok sabha marathi news, praniti shinde lok sabha marathi news
“सिध्देश्वरची चिमणी पाडल्याचा बदला घ्या, भाजपला धडा शिकवा”, धर्मराज काडादी यांची भूमिका
Mayawati Chandrashekhar Aazad
मायावतींची नवी खेळी; चंद्रशेखर आझाद यांना टक्कर देण्यासाठी पुतण्या रिंगणात
Devendra Fadnavis and Uddhav Thackeray
“तुमच्या जाण्यायेण्याचा खर्च मी करतो, फक्त तुम्ही…”; उद्धव ठाकरे यांची देवेंद्र फडणवीसांना खुली ऑफर

भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना फोन कॉलद्वारे एका अज्ञात व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या व्यक्तीने विकास गोगावले यांना चार ते पाच दिवसांचा इशारा दिला आहे. विशेष म्हणजे फोन कॉलद्वारे गोगावले यांना शिवीगाळदेखील करण्यात आली आहे. या घटनेनंतर गोगावले यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या घटनेची दखल घेत गुन्हा दाखल केला आहे. याबाबतचे वृत्त एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिले आहे.

हेही वाचा >> “भाजपाला तरी काय नावं ठेवणार, चिदंबरम यांनीच…”, छगन भुजबळ यांचं सूचक वक्तव्य

धमकीच्या फोनकॉलबाबत बोलताना “मागील दोन दिवसांपासून मला अज्ञात व्यक्तीकडून फोन केला जातोय. माझ्या वडिलांनादेखील हे फोन कॉल आले आहेत. आम्हाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. तुम्ही शिंदे गटात गेले आहात. त्यामुळे आम्हाला धमकी देण्यात आली आहे. मात्र आम्ही याला घाबरणार नाही. आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिकआहोत. त्यामुळे आम्ही एकनाथ शिंदे यांचे समर्थक आहोत. मी याबाबत गावदेवी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे,” अशी माहिती विकास गोगावले यांनी दिली आहे.