राहाता: ‘‘वारकरी संप्रदाय विश्वाला वंदनीय असून तो जिवंत ठेवण्यासाठी परोपकारी व्यक्तींची गरज आहे. बाळासाहेब विखे पाटील हे परोपकारी होते. त्यांच्या कुटुंबात या परंपरेतील व्यक्ती निर्माण व्हावेत,’’ असे गौरवोद्गार जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ अध्यापक मारुतीबाबा कुऱ्हेकर यांनी काढले. दरम्यान लोणी येथील तुकाराम बीजोत्सव सोहळय़ात यावर्षीचा पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील स्मृती संत सेवा पुरस्कार मारुतीबाबा कुऱ्हेकर यांना प्रदान करण्यात आला.

लोणी बुद्रुक येथे सुरू असलेल्या तुकाराम बीजोत्सव २०२२ निमित्त आयोजित ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, भागवताचार्य  रुक्मिणी हावरे यांच्या श्री विठ्ठल चरित्र कथा सोहळय़ाची सांगता वरदविनायक सेवाधामचे मठाधिपती महंत उध्दव महाराज मंडलिक नेवासेकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने आज सोमवारी झाली. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज सेवा ट्रस्ट व लोणी बुद्रुक ग्रामस्थानी सोहळय़ाचे आयोजन केले होते. त्यांच्या  वतीने दिला जाणारा पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील स्मृती संत सेवा पुरस्कार २०२२ याच सोहळय़ात गुरुवर्य मारुतीबाबा कु-हेकर यांना माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे, ध्रुव विखे, महंत उद्धव महाराज मंडलिक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. स्मृतिचिन्ह, मानपत्र व २५ हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. गेल्या पाच वर्षांपासून हा पुरस्कार दिला जातो.

kalyan lok sabha seat, dr Shrikant Shinde, criticise uddhav thackeray, criticise vaishali darekar, lok sabha 2024, mimicry artist, uddhav thackeray mimicry artist, uddhav thackeray shivsena, eknath shinde shivsena, kalyan dombivali news, election 2024,
बॉस नकलाकार असला की कार्यकर्तेही नकलाकारच असतात, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची वैशाली दरेकर यांच्यावर टीका
kolhapur lok sabha marathi news, hatkanangale marathi news
सन्मान नाही तोवर प्रचार नाही; संजय पाटील यांची धैर्यशील माने यांच्यावर नाराजी
piyush goyal
लखलखत्या तरुण तेजांकितांचा आज गौरव; केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल प्रमुख अतिथी
chandrachud
‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ सोहळा; सरन्यायाधीश चंद्रचूड प्रमुख अतिथि, विविध क्षेत्रांतील १८ प्रज्ञावंतांचा सन्मान

यावेळी कुऱ्हेकर महाराज म्हणाले की, विखे परिवार परोपकारी असल्याने बाळासाहेब विखे पाटील यांच्या स्मृती चंद्र-सूर्य असेपर्यंत राहतील असे सांगताना आपल्यासाठी हा पुरस्कार आगळावेगळा असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी महंत उद्धव महाराज वारकरी संप्रदायाचे वैभव असल्याचे गौरवोद्गार काढले.

महंत उद्धव महाराज म्हणाले की, आज या पुरस्काराची  उंची वाढली आहे. सामाजिक सेवा आणि संत सेवेत विखे पाटील परिवार हा कायमच सोबत राहिला आहे. पदमभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील आणि कुऱ्हेकर बाबांचे कार्य समाजाप्रती आहे, जोग महाराजांचे आपल्यावर खूप उपकार आहेत. कीर्तनकार घडवून वारकरी संप्रदाय वाढविला. जोग महाराज संस्था पवित्र कार्य करते. विखे परिवाराला शोभेल असा निधी डॉ. राजेंद्र विखे पाटील यांनी संस्थेला दिला. कुऱ्हेकर बाबांनी निष्काम कर्मयोग्याप्रमाणे हे काम पुढे नेण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्च केले. तुकाराम महाराज सेवा ट्रस्ट व लोणी ग्रामस्थांनी बीजोत्सवाच्या माध्यमातून मोठे आध्यात्मिक कार्य सुरू केले असून ते कौतुकास्पद आहे.

अण्णासाहेब म्हस्के म्हणाले की, संताचे अनुष्ठान असल्यामुळेच आपण सुखाने जगत आहोत. कुऱ्हेकर बाबांनी हा पुरस्कार  स्वीकारल्याने पुरस्काराची उंची वाढली आहे. शालिनीताई विखे म्हणाल्या की, संताचे विचार प्रेरणा देणारे आहेत. अध्यात्मातून मन:शांती मिळते व आदर्श समाज निर्माण होण्यास मदत होते. नव्या पिढीला चांगले संस्कार मिळतात.

यावेळी विखे पाटील परिवाराच्या वतीने प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे  यांच्या वतीने स्व. सिंधुताई विखे यांच्या स्मरणार्थ जोग वारकरी शिक्षण संस्थेसाठी एक लाखाची देणगी यावेळी शालिनीताई विखे  यांच्या हस्ते हभप  कु-हेकर बाबांना देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ पत्रकार दादासाहेब म्हस्के यांनी केले. मानपत्राचे वाचन मुख्याध्यापक रामचंद्र निंबाळकर यांनी केले तर डेप्युटी अनिल विखे यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी  ट्रस्टचे अध्यक्ष देविदास म्हस्के, उपाध्यक्ष भाऊ विखे आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ व भाविक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. भाविकांना महाप्रसाद देण्यात आला.