हिवाळी अधिवेशनात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मंत्री दीपक केसरकर समोरा-समोर आले होतं. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी दीपक केसरकरांकडे आपली नाराजी बोलून दाखवली होती. “विधिमंडळच्या आत आणि बाहेर जे काही चाललं आहे, ते योग्य नाही. शाखा ताब्यात घेणं, कार्यालय ताब्यात घेणं शोभत का?,” असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला होता.

उद्धव ठाकरेंच्या प्रश्नावर दीपक केसरकरांनी १ जानेवारीला भाष्य केलं होतं. “ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांसाठी लढा लढवला, ते सहजासहजी सोडून जात नाहीत. निश्चितपणे काहीतरी घडलेलं आहे, ज्यामुळे आमदार बाहेर पडले. नेमकं काय घडलं होते, याचं उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे. उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण केले, तर शिवसेना एकसंध होण्यास वेळ लागणार नाही,” असेही दीपक केसरकर म्हणाले होतं.

narendra modi
धर्माच्या आधारावर आरक्षणाचा प्रयत्न! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसवर आरोप
D Y Chandrachud News in Marathi
‘न्यायव्यवस्था कमकुवत करण्याचा प्रयत्न’; २१ निवृत्त न्यायाधीशांनी डीवाय चंद्रचूड यांना पत्र लिहित व्यक्त केली चिंता
Sharad Pawars appeal to the youth to question to government regarding jobs and employment
आश्वासन वर्षाला दोन कोटी रोजगारांचे, प्रत्यक्षात नऊ वर्षांत सात लाखच नोकऱ्या; सरकारला जाब विचारण्याचे शरद पवार यांचे तरुणाईला आवाहन
Vanchit Bahujan Aghadi Changes Lok Sabha Candidates in maharashtra ahead of lok sabha 2024 Election
‘वंचित’ चा फेरबदल कोणाच्या फायद्याचा? कोणाच्या सांगण्यावरून?

हेही वाचा :  “बापरे, होय का? मला वाटलं मुंबईवर अणुबॉम्ब…”, मानहानीच्या दाव्यावरून संजय राऊतांचा राहुल शेवाळेंना खोचक टोला!

उद्धव ठाकरेंना आत्मपरिक्षणाचा सल्ला देणाऱ्या केसरकारांवर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी टीका केली आहे. “काल परवापर्यंत ओठ सुद्धा न उघडणारे केसरकर खूप पोपटपंची करत आहेत. अत्यंत जाणकार वृत्तीप्रमाणे उद्धव ठाकरेंना आत्मपरिक्षण करण्याचा सल्ला देण्याचा आगावपणा केसरकरांनी केला. पण, ज्या-ज्या पक्षाने मोठं केलं, त्यांना फसवण्याचा धंदा तुम्ही केला,” असं टीकास्त्र विनायक राऊतांनी केसरकरांवर सोडलं आहे.

हेही वाचा : “जितेंद्र आव्हाड भूगोल विसरले का?” ‘त्या’ ट्वीटवरून चंद्रशेखर बावनकुळेंची आगपाखड; म्हणाले, “इतका नीचपणा?”

“निष्ठा, श्रद्धा आणि उपकाराची फेड परोपकाराने कशी करावी, याचं आत्मपरिक्षण केसरकरांसारख्या धुरंधी, मुत्सदी आणि स्वार्थी राजकारण्याने करण्याची गरज आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचाच उमेदवार निवडून येणार. दीपक केसरकरांची अनामत रक्कम जप्त केल्याशिवाय मतदार शांत राहणार नाही,” असं विनायक राऊतांनी सांगितलं.