रत्नागिरी: कोकणातील विधानसभा निवडणुकीतील पराभव जिव्हारी लागल्यानंतर कार्यकर्त्यांच्या मागणी नुसार निवडणुकीत पक्षांच्या विरोधात काम करणा-यांवर आता कारवाई करण्यात येणार असल्याचे माजी खासदार विनायक राऊत यांनी सांगितले आहे. तसेच या पदाधिकारी लोकांना कार्यकारणीतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात येणार आहे.

राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकारी आणि  कार्यकर्त्यांनी पक्षाच्या विरोधात जावून महाविकास आघाडीच्या विरोधात काम केले होते. याचा मोठा फटका ठाकरेंच्या शिवसेनेला बसला होता. मात्र अशा विरोधात काम  करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना लवकरच  पक्षाच्या कार्यकारिणीतून नारळ देण्यात येणार असल्याचे शिवसेना सचिव आणि माजी खासदार विनायक राऊत यांनी चिपळूण येथे सांगितले.

Will not be forgiven if entrepreneurs are troubled says Devendra Fadnavis
उद्योजकांना त्रास झाल्यास क्षमा केली जाणार नाही… मुख्यमंत्र्यांनी कुठल्या नेत्यांना दिला इशारा!
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Viral Video Of Desi Jugaad
कामगाराला बाहेर काढण्यासाठी लावलं भन्नाट डोकं; Video तील जुगाड पाहून तुम्हीही म्हणाल, ‘चुकूनही देशाबाहेर… ‘
Eknath shinde loksatta news
रायगड, नाशिकच्या पालकमंत्रीपदांचा तिढा लवकरच सुटेल – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Speed ​​Limit, Signal Violation, Accident, Nagpur,
तुम्हीही ‘सिग्नल’ तोडता का? मग ‘हे’ वाचाच, कारण वर्षभरात तब्बल….
Jawahar Medical College Deans office frozen dhule Municipal Corporation takes action due to arrears
जवाहर वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता कार्यालय गोठविले; थकबाकीमुळे मनपाची कारवाई
दोनदा मुदतवाढीनंतर मनीष नगर रेल्वे भुयारी मार्ग खुला होणार
bmc commissioner bhushan gagrani express view about bmc fd
मुदतठेवींबाबत चिंता नाही! नियोजन न केल्यास मात्र आर्थिक चणचण, मुंबई पालिका आयुक्तांचा इशारा

हेही वाचा >>>Varsha Gaikwad : ‘मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे, राज्यात जे घडतंय ते…’, सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर वर्षा गायकवाड संतापल्या

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी  चिपळूण येथे आले असता ते बोलत होते. यावेळी राऊत म्हणाले, प्रत्येक पक्षात निवडणुकीच्या काळात काही बेईमान लोक मान वर काढत असतात, तसे शिवसेनेतही बेईमान आणि गद्दार लोक निघाले आहेत. मात्र अशा बेइमान लोकांना योग्यवेळी  त्यांची जागा दाखवून देण्याचे काम शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार आम्ही करणार असल्याचे स्पष्ट केले. भास्कर जाधव यांनी केलेल्या सूचनाचे  फार भांडवल करण्याची गरज नाही. मात्र पक्षाच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांचा कालावधी निश्चित करून देण्याची आवश्यकता आहे. ती आमदार भास्कर जाधव यांनी केलेली सूचना योग्यच आहे.  या सूचनेप्रमाणे पक्षाच्या घटनेत तसा बदल करण्याचे उद्धव ठाकरे यांनी मनावर घेतले आहे. त्यामुळे या सूचना केल्या म्हणजे त्यांनी काही वावगे केलेले नाही, असेही विनायक राऊत यांनी सांगितले.

Story img Loader