पाच पोलीस किरकोळ जखमी; १२ जणांनाअटक

नगर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त नगर व भिंगारमध्ये निघालेल्या मिरवणुकीला काल, गुरुवारी रात्री उशिरा दगडफेक, दोन गटातील घोषणायुद्धाचे तसेच मारामाऱ्यांचे गालबोट लागले. दगडफेकीत पाच पोलीस किरकोळ जखमी झाले. पोलिसांनी एकूण तीन स्वतंत्र गुन्हे दाखल केले असून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून १२ जणांना अटक केली आहे. त्यांना १८ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने आज शुक्रवारी दिला.

Pune, gun firing, hotel,
पुणे : शहरात गोळीबारीची सलग चौथी घटना, हॉटेलमध्ये गोळीबार
Pune, firing, Firing on youth,
पुणे : शहरात गोळीबारची तिसरी घटना, काडीपेटी न दिल्याने तरुणावर गोळीबार
old man hit by bike rider, Kamothe,
कामोठेत वृद्धाला दुचाकीस्वाराने उडवले
pimpri traffic police marathi news,
पिंपरी: फॅन्सी नंबर प्लेट, काचेला काळी फीत लावणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध पोलिसांची मोहीम; ४०६ वाहनांवर कारवाई

आरपीआय कार्यकर्ते व मुस्लीम युवक यांच्यामध्ये तिन्ही ठिकाणी धुमश्चक्री उडाली. कोतवाली पोलीस ठाण्याजवळील तख्ती दरवाजा भागात रात्री दोन गटात घोषणायुद्ध रंगले, तर तेलीखुंट भागात रात्री दगडफेक झाली. भिंगारमध्ये रात्री दोन गटात हाणामारी झाली.

मिरवणूक तख्ती दरवाजा भागात आली असताना दोन गटात घोषणायुध्द  झाले. यासंदर्भात पोलिसांनी दोन्ही बाजूच्या सुनील क्षेत्रे, राकेश वाघमारे, मृणाल भिंगारदिवे, आकाश सरोदे, सुबोध ढोणे, प्रशांत पाटोळे, सचिन बुंदेले, जयेश माघारे, कासिम शेख, मसीन शेख, पैलवान हा बुर्हाण उर्फ शानू अब्दुल कादर शहानवाज, अस्मा क्रोकरीवाला व इतर जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या घटनेत अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

मिरवणूक पुढे तेलीखुंट भागात आल्यावर दोन गटात पुन्हा झालेल्या दगडफेकीत अविनाश वाकचौरे, सुधीर क्षीरसागर, चेतन मोहिते, संदीप घोडके, प्रदीप सानप हे पोलीस किरकोळ जखमी झाले. या घटनेसंदर्भात १३ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यातील दोन अल्पवयीन आहेत. ११ जणांना १८ पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

या घटनेत शबाब शहानवाज शेख, फिरोज शेख, मुजाहिद हुसेन शेख, इरफान शकील शेख, शोएब शेख, अरिफ आसिफ सय्यद, शकीब अन्सार सय्यद, दानिश शकील सय्यद, तह अन्वर खान अदनान हुसेन शेख सनी जावेद पठाण यांना अटक करण्यात आली आहे.

भिंगारमध्ये एक जखमी, एकास अटक

याच सुमारास भिंगारमधील मिरवणुकीलाही दोन गटातील हाणामाऱ्यांचे गालबोट लागले. त्यामध्ये फैजल खान जखमी झाला. पोलिसांनी सुनील सोनवणे याला अटक केली आहे. परस्परविरोधी फिर्यादीनुसार सुनील सोनवणे, शिवा भागानगरे, अशिष क्षेत्रे, आकाश क्षेत्रे, व इतर चार ते पाच जण, तसेच सादाब (पूर्ण नाव नाही), मुक्तार नसीर शेख, फैजल हुसेन शेख, तोसिफ शेख, अरबाज खान, भंगारवाला याचा मुलगा मुन्ना, निसार कसाई यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.