अमरावती : त्रिपुरात समाजबांधवांवर अत्याचार आणि प्रार्थनास्थळांची नासधूस या घटनांच्या निषेधासाठी मुस्लीम बांधवांनी शुक्रवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चादरम्यान चित्रा चौक ते मालवीय चौकादरम्यान काही दुकानांवर दगडफेक करून वाहनांची नासधूस करण्यात आली. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. दगडफेकीत तीन जण जखमी झाले.

मोर्चेकरी शहरातील कॉटन मार्केट परिसरातून जात असताना काही समाजकं टकांनी सुरुवातीला गोपाल किराणा स्टोअर्सवर,बालाजी मार्केट परिसरातील फू ड झोन, लढ्ढा इंटेरियर, मेडिकल पॉईंट, जयभोले दाबेली, राजपूत डेअरी, शुभम इलेक्ट्रिकल या दुकानांवर दगडफे क करून फू ड झोनमध्ये दुकानातील पैसे लुटण्याचा प्रयत्न के ला. या झटापटीत दुकानदार मीलन गांधी तर दगडफे कीत शिवा गुप्ता आणि विशाल तिवारी व अन्य जखमी झाल्याचे कळते. यानंतर परिसरातील दुकाने बंद करण्यात आली. मोर्चेकरी जिल्हाधिकारी कार्यालयावरून परतत असताना काही तरूणांनी धुडगूस घातला. त्यामुळे दुकानदारांमध्ये रोष आहे. यानंतर पोलीस उपायुक्त विक्र म साळी घटनास्थळी पोहचले. या भागात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. भाजपचे नेते जगदीश गुप्ता, तुषार भारतीय, शिवराय कु ळकर्णी यांनी या घटनेचा निषेध के ला आहे.