VIDEO: ‘मी काय कुंद्रा आहे का?’ पाहा असं का म्हणाले राज ठाकरे

राज ठाकरेंचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

raj thackeray, raj kundra
राज ठाकरेंचा व्हिडीओ व्हायरल…

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे त्यांच्या हजरजबाबीपणामुळे कायम चर्चेत असतात. यावेळी त्यांनी राज कुंद्रा यांच्यावरून पत्रकार आणि फोटोग्राफर्सना मिश्किल टोला हाणला. त्यांच्या वक्तव्याने उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. त्यांच्या वक्तव्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे. राज ठाकरे तीन दिवसीय पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी पक्षाची मोट बांधत आगामी महापालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी केली जात आहे.

राज ठाकरे पुण्यातील कार्यालयात दाखल झाल्यानंतर सर्व पत्रकार, कॅमेरामन, फोटोग्राफर्सने त्यांचे फोटोज, व्हिडीओ घेण्यासाठी गर्दी केली होती. बराचवेळ फोटोग्राफर फोटोज काढत होते हे पाहून राज ठाकरेंनी हसत हसत एक मिश्किल टोला लगावला आहे. राज ठाकरेंनी हसत हसत फोटाग्राफर्सकडे पाहिले आणि म्हणाले, काल पण माझेच फोटो आणि आज पण..किती वेळा तेच तेच. मी काय कुंद्रा आहे का?

महापालिकेची आगामी निवडणूक पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात अपेक्षित आहे. त्या दृष्टीने गेल्या आठवड्यातही राज ठाकरे पुणे दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने प्रमुख पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली होती. या दौऱ्यात त्यांनी शाखा अध्यक्षांची नव्याने नेमणुका करण्याचे आदेश शहराध्यक्ष वसंत मोरे आणि पक्षाचे नेते बाबू वागसकर यांना दिले होते. त्यानुसार राज ठाकरे यांच्या उपस्थितीतच या नेमणुका करण्यात येणार आहेत. बुधवारी कसबा, पर्वती आणि हडपसर विधानसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात येतील. तर, गुरुवारी शिवाजीनगर, कोथरूड आणि पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघातील तर शुक्रवारी खडकवासला आणि वडगांवशेरी विधानसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका होतील, असे वसंत मोरे आणि बाबू वागसकर यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Viral video raj thackeray says am i kundra as cameraman and videographer did not stop taking photos dcp

ताज्या बातम्या