काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना असे तीन राजकीय पक्ष सत्तास्थापनेसाठी एकत्र येतील, असं कुणाच्या स्वप्नात देखील आलं नव्हतं. पण संजय राऊत यांच्यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं असं विधान सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी केलं आहे.

त्यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं की, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या अंगात आलं आणि महाविकास आघाडी स्थापन झाली. त्यांच्यामुळे आम्ही राज्यात सत्तेवर आलो, असे सत्तास्थापनेचं गुपित कदम यांनी सांगितलं आहे. पलूस तालुक्यातील आमणापूर येथे विविध विकास कामाचे उद्घाटन कदम यांच्या हस्ते झालं. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

Kolhapur A Y Patil
कोल्हापूर राष्ट्रवादीतील वाद उफाळला; हसन मुश्रीफ, के. पी. पाटील यांनी माझे राजकारण संपवण्याचे काम केले – ए. वाय. पाटील कडाडले
मोहिते-पाटीलविरोधक उत्तम जानकर सोलापूर लोकसभेसाठी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये
rashmi kolte bagal joins bjp marathi news, digvijay bagal joined bjp marathi news
करमाळ्याच्या बागल गटाचे पक्षांतराचे वर्तुळ पूर्ण! भाजपमध्ये स्थिरावरणार का ?
mahavikas aghadi prakash ambedkar marathi news, prakash ambedkar latest marathi news, prakash ambedkar mahavikas aghadi marathi news
वंचितबरोबर जागावाटपाबाबत महाविकास आघाडीचे नेते साशंक

राज्यमंत्री कदम पुढे म्हणाले की, आम्ही निवडून आलो, विरोधी बाकांवर बसावे लागणार होते. मात्र खासदार राऊत यांच्या अंगात आलं आणि कधीही एकत्र येणार नाहीत, असे तीन पक्ष एकत्र आले. म्हणूनच राज्याची सत्ता महाविकास आघाडीच्या हाती आली.” विश्वजित कदम यांनी मंगळवारी रात्री आमणापूर गावाला भेट दिली. त्यांनी बोरजाईनगर, श्रीराम मळा, विठ्ठलवाडी, अनुगडेवाडी आणि आमणापूर येथील विविध विकासकामांचे उद्घाटन राज्यमंत्री केले.