Walmik Karad wife reaction: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज मोठी घडामोड घडली. खंडणी प्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मिक कराडवरही आज मकोका दाखल करण्यात आला असून त्याला १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे. यानंतर परळीत मात्र आंदोलन सुरू झाले असून कराड समर्थकांनी परळी बंदची हाक दिली. बीड शहर पोलीस ठाण्याबाहेर वाल्मिक कराड समर्थकांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. वाल्मिक कराडची ७५ वर्षांची आई आणि पत्नीही या ठिय्या आंदोलनात सहभागी आहेत. यावेळी त्याच्या पत्नीने माध्यमांशी बोलताना, कराडवरील आरोप फेटाळून लावले. तसेच कराडचा वापर करणारे मंडळीच त्याच्यावर आरोप करत असल्याचे म्हटले. तसेच मनोज जरांगे पाटील जातीयवादी माणूस असल्याचेही, त्या म्हणाल्या.

वाल्मिक कराड यांच्या पत्नी मंजिली कराड म्हणाल्या, “आज कराडवर जे राजकीय नेते आरोप करत आहेत. तेच एकेकाळी कराडकडून मदत घेत होते. आज त्यांच्या राजकीय फायद्यासाठी त्यांनी माझ्या पतीचा बळी देऊ नये. आज आरोप करणाऱ्यांनी कराडचा वापर करून घेतला. निवडून येण्यासाठी त्यांना माझ्या पतीचे सहकार्य पाहिजे होते. पण आज निवडून आल्यानंतर सत्तेत पद मिळविण्यासाठी माझ्या पतीचा बळी दिला जात आहे.”

Young man beaten up for watching news against Valmik Karad and Dhananjay Munde
“वाल्मीक कराड, मुंडेंविरोधातील बातम्या का पाहतो” म्हणत तरुणाला मारहाण, बीडच्या धारूरमधील घटना
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
veer pahariya first reaction after marathi comedian pranit more assaulted
“कोणत्याही प्रकारच्या हिंसेचा…”, प्रसिद्ध मराठी कॉमेडियनवरील हल्ल्याबाबत वीर पहारियाचं स्पष्टीकरण, नेमकं काय घडलं?
अग्रलेख : आहे बहुमत म्हणून…?
What Manoj Jarange Said?
Manoj Jarange : मनोज जरांगेंचं वक्तव्य, “धनंजय मुंडे रात्री दोन वाजता भेटले होते, वाल्मिक कराडही होता, सगळे पाया पडले आणि…”
Ramdas Kadam On NCP Ajit Pawar Group
Ramdas Kadam : राष्ट्रवादी-शिंदे गटात वादाची ठिणगी? रामदास कदमांचा मोठा आरोप; म्हणाले, “राष्ट्रवादीच्या ९० टक्के कार्यकर्त्यांनी…”
Manoj Jarange Statemet on Namdev Shashtri
Manoj Jarange : मनोज जरांगेंची नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर जोरदार टीका, “जातीयवादाचा नवा अंक…”
laxmi narayan tripathi on mamta kulkarni
ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर केलं अन् तिच्यासह झाली हकालपट्टी; त्रिपाठी म्हणाल्या, “तिने इस्लाम…”

मनोज जरांगे समाजकंटक

मंजिली कराड पुढे म्हणाल्या, मनोज जरांगे पाटील एकप्रकारचा समाजकंटक आहे. समाजात तेढ निर्माण करणारा समाजकंटकच असतो. त्यावर जीतावाद पसरविण्याचा गुन्हा दाखल केला पाहिजे. मराठा, मराठा काय करतो तो. मीही ९६ कुळी मराठा आहे. आमच्या महाराजांनी असे जातीवाद करण्यास शिकवले नव्हते. जात बघून खून किंवा गुन्हे होत नाहीत. जातीवादामध्ये माझ्या नवऱ्याचा हकनाक बळी दिला जात आहे. या प्रकरणाला भयानक जातीवादाचे वळण दिले जात आहे. जरांगेच्या पाठीमागे मराठा समाज उभा नाही.

एवढेच नाही तर मंजिरी कराड यांनी अंजली दमानिया यांचाही उल्लेख केला. “अंजली दमानिया यानी एसआयटीमधील काही पोलिसांचा वाल्मिक कराड यांच्याबरोबरचा फोटो दाखवला होता. पण आताच्या एसआयटीचे प्रमुख तेली हे आष्टीचे जावई आहेत. म्हणजे एसआयटीवर त्यांनी जावई आणून बसवला आहे. याचा अर्थ सुरशे धस यांनी आपल्या सोईनुसार आपली माणसे एसआयटीत आणले असून त्यांनी वंजारी समाजाला लक्ष्य केले आहे”, असा आरोप त्यांनी केला.

Story img Loader