वर्धा : आश्रमशाळा अधीक्षकाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार; हिंगणघाट पोलिसांनी आरोपीला केली अटक | Wardha man rape minor in Ashram Shala scsg 91 | Loksatta

वर्धा : आश्रमशाळा अधीक्षकाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार; हिंगणघाट पोलिसांनी आरोपीला केली अटक

मुलीची प्रकृती ठीक नसल्याचे कारण देत शाळा प्रशासनाने तिला परत घेऊन जाण्याची सूचना पालकांना केली. त्यानुसार मुलीला घेऊन पालक त्याच दिवशी हिंगणघाटला आले.

वर्धा : आश्रमशाळा अधीक्षकाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार; हिंगणघाट पोलिसांनी आरोपीला केली अटक
वैद्यकीय तपासणी झाली. त्यात मुलीवर अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले.

तेरा वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी चंद्रपूर जिल्ह्यातील एका आश्रमशाळेचे अधीक्षक संजय एकनाथ इटनकर यास अटक करण्यात आली.

पिडीतेचे पालक चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी असून काही महिन्यांपूर्वी हिंगणघाट शहरात राहायला आलेत. त्यांनी आपल्या मुलीला चंद्रपूर जिल्ह्यातील एक निवासी आश्रमशाळेत शिकण्यासाठी पाठवले होते. दरम्यान, मुलीची प्रकृती ठीक नसल्याचे कारण देत शाळा प्रशासनाने तिला परत घेऊन जाण्याची सूचना पालकांना केली. त्यानुसार मुलीला घेऊन पालक त्याच दिवशी हिंगणघाटला आले. घरी आल्यावर प्रकृतीची विचारपूस केली असता मुलीने आपल्यासोबत घडलेला अनुचित प्रकार कथन केला. यानंतर पालकांनी मुलीला उपजिल्हा रुग्णालयात नेले. वैद्यकीय तपासणी झाली. त्यात मुलीवर अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर हिंगणघाट पोलिसांनी ३७६ व पोक्सो अंतर्गत गुन्हे दाखल करीत इटनकर यास अटक केली.

दरम्यान, आमदार समीर कुणावार यांनी ही घटना दुर्दैवी असल्याचे सांगितले. पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी तसेच सदर आश्रमशाळेची मान्यता रद्द करावी म्हणून पाठपुरावा करणार असल्याचे कुणावार म्हणाले. दरम्यान, आरोपीस अटक करून चंद्रपूर पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले आहे.

भद्रावती तालुक्यातील बरांज तांडा येथील गमाबाई निवासी आश्रम शाळेची ही विद्यार्थिनी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तुकाराम पवार अध्यक्ष असलेल्या संस्थेच्या वतीने संचालित ही शाळा आहे. कोरपना व जिवती तालुक्यातदेखील पवार यांच्या आश्रमशाळा, महाविद्यालय व हायस्कूल आहेत. सर्वप्रथम हे प्रकरण भद्रावती पोलीस ठाण्यात गेले होते. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात न घेता संस्थाचालक हे प्रकरण उघडकीस येऊ नये यासाठी प्रयत्नरत होते. परंतु, हिंगणघाट पोलिसांनी अधीक्षक इटनकर याला अटक करताच खळबळ उडाली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
मुख्यमंत्री शिंदे नीति आयोगाच्या फोटोत शेवटच्या रांगेत : उदय सामंत म्हणतात, “…ते कोणाला दिसलं नाही हे आपलं दुर्दैव”

संबंधित बातम्या

भर पत्रकार परिषदेत संभाजी ब्रिगेडकडून शाईफेक, गुणरत्न सदावर्तेंची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले, “पवार-ठाकरेंच्या पिलावळींना…”
Video: “हा व्हिडीओ पाहा, उद्धव ठाकरेंच्याही पायात बूट…”, भाजपाचं काँग्रेसला प्रत्युत्तर; ‘तो’ व्हिडीओ केला शेअर!
“शरद पवार हे ‘रिंग मास्टर’ आहेत, ते जसं…” राऊतांवर टीकास्र सोडताना शिंदे गटाच्या नेत्याचं विधान
VIDEO: “स्वतंत्र मराठवाडाच नाही, तर मुंबईही केंद्रशासित प्रदेश करून दाखवू आणि…”, शरद पवारांचं नाव घेत सदावर्तेंचं मोठं वक्तव्य
VIDEO: भर पत्रकार परिषदेत गुणरत्न सदावर्तेंवर शाईफेक का केली? संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते म्हणाले, “भाजपाचं पिल्लू…”

व्हिडिओ

ताज्या बातम्या
‘कामाख्या देवीकडे काय प्रार्थना केली?’ मुख्यमंत्री म्हणाले, “राज्यातील जनतेला…”
दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या आगामी चित्रपटात दिसणार सिद्धार्थ जाधव? पोस्टर शेअर करत म्हणाला…
“अभिनयातील बहुआयामी ‘विक्रम’ काळाच्या पडद्याआड”, मुख्यमंत्री आणि राज्यपालांकडून विक्रम गोखलेंना श्रद्धांजली
“शरद पवार हे ‘रिंग मास्टर’ आहेत, ते जसं…” राऊतांवर टीकास्र सोडताना शिंदे गटाच्या नेत्याचं विधान
पुण्यातील लोहगाव परिसरात टोळक्याकडून गोळीबार; शहरात गोळीबाराची दुसरी घटना