scorecardresearch

वर्धा : अवैध गर्भपात प्रकरणातील मुख्य आरोपीचा पती डॉ.नीरज कदमला अटक

कदम हॉस्पिटल परिसरात अर्भकांच्या ११ कवट्या आणि ५२ हाडं आढळल्याने एकच खळबळ उडाली होती.

राज्यभर गाजत असलेल्या आर्वीतील बहुचर्चित अवैध गर्भपात प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या डॉ. रेखा यांचे पती डॉ. नीरज कदम यास अखेर अटक करण्यात आली आहे., आज पहाटे ही अटक आर्वी पोलिसांनी केली. बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक, पोस्को अंतर्गत ही अटक करण्यात आल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील सोळुंके यांनी सांगितले आहे.

विशेष म्हणजे वैद्यकीय गैर कारभारा बद्दल आरोग्य विभागाने अद्याप पोलीस तक्रार न केल्याने, पोलीस अवैध गर्भपात करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारच्या अनुषंगाने कायदेशीर कारवाई करीत आहे.

पोलिसांनी आरोग्य विभागास रुग्णालयाचा मुदत बाह्य परवाना, सापडलेली हाडे व कवट्या, नियमबाह्य औषधी खरेदी व अन्य वैद्यकीय त्रुटींबाबत तक्रार करण्याबाबत पत्रच दिले. मात्र या विषयी अधिकार असलेल्या आरोग्य खात्याने तक्रारच दिलेली नाही. तक्रार आल्यावर गुन्हे दाखल करीत कारवाई करण्याची भूमिका पोलिसांनी घेतली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Wardha the main accused in the illegal abortion case dr rekhas husband dr neeraj kadam arrested msr

ताज्या बातम्या