३१ डिसेंबरसह तीन दिवस वासोटा किल्ला पर्यटकांसाठी राहणार बंद

वासोटा किल्ला येथे मोठ्या प्रमाणात ट्रेकर्स येत आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

वनसंरक्षणाच्या दृष्टीने सरत्या वर्षाच्या शेवटी म्हणजेच ३०,३१डिसेंबर व एक जानेवारी या तिन्ही दिवशी वासोटा किल्ला पर्यटनास बंद राहणार असल्याचे वनविभागाने कळविले आहे.

वासोटा किल्ला येथे मोठ्या प्रमाणात ट्रेकर्स येत आहेत. विशेषतः सलग सुट्ट्यांच्या कालावधीत येथे ट्रेकर्सची गर्दी होऊ लागली आहे. यामुळे वनक्षेत्रास धोका निर्माण होत असल्याचे काही ट्रेकर्सचे म्हणणे आहे.

वनसंरक्षणाच्या दृष्टीने येत्या ३०,३१ डिसेंबर आणि एक जानेवारी या तिन्ही दिवशी वासोटा किल्ला पर्यटनासाठी बंद राहणार असल्याचे वनविभागाच्यावतीने बी. डी. हसबनीस (वनक्षेत्रपाल, बामणोली) यांनी कळविले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Wasota fort will be closed for three days dmp

Next Story
‘बुद्धिस्ट सर्किट’ विकासातून पर्यटनास चालना
ताज्या बातम्या