कचराडेपोसाठी दिलेला ना हरकत दाखला रद्द

नगर : महापालिकेला कचराडेपोसाठी दिलेले ना हरकत प्रमाणपत्र रद्द करण्याचा ग्रामसभेचा ठराव तसेच कचरा डेपो कायमस्वरूपी बंद करावा या मागणीचे पत्र आज, शुक्रवारी बुरुडगाव ग्रामपंचायतीच्या वतीने महापालिका आयुक्त शंकर गोरे यांना देण्यात आले. बुरुडगावकरांच्या या भूमिकेमुळे नगर शहरामध्ये कचराकोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे.

Kidnapping of officer in case of embezzlement in Kolhapur Zilla Parishad
कोल्हापूर जिल्हा परिषदेतील अपहारप्रकरणी अधिकाऱ्याचे अपहरण, मारहाण प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त
Farmers, Farmers news,
प्रकल्प घोषणेपूर्वी शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे
Slum cleaning contract
झोपडपट्टी स्वच्छता कंत्राट : चौथ्यांदा मुदतवाढीची नामुष्की, १५ एप्रिलला न्यायालयात सुनावणी
The district administration announced the list of campaign materials along with food items in the list fixed to account for Lok Sabha election expenses pune
जिल्हाधिकाऱ्यांनी पुण्यात आणली ‘स्वस्ताई’; जाणून घ्या कशी?

बुरुडगाव ग्रामपंचायतीचे सदस्य जालिंदर वाघ, बाळासाहेब जाधव, जालिंदर कुलट व राधाकिसन कुलट यांनी ग्रामसभेच्या ठरावाची प्रत व कचराडेपो कायमस्वरूपी बंद करण्याच्या मागणीचे पत्र आयुक्तांना दिले. आयुक्तांनी त्यांना लवकरच चर्चेसाठी बैठक घेऊ, असे आश्वासन दिले आहे. बुरुडगावच्या १६ नोव्हेंबर रोजी झालेल्या ग्रामसभेत महापालिकेला बुरुडगावमधील कचरा डेपोसाठी दिलेला ना हरकत दाखला रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. या ठरावाची प्रत मनपा आयुक्तांना सादर करण्यात आली.

या निवेदनात म्हटले की, बुरुडगावच्या गट क्रमांक ३४ मध्ये महापालिका शहरातील कचरा, घाण व इतर टाकाऊ पदार्थ रोज आणून टाकत आहे. दि. १० सप्टेंबर २०२० रोजी ग्रामपंचायतीने महापालिकेला ना हरकत दाखला दिला होता. परंतु बुरुडगावचे ग्रामस्थ व शेतकऱ्यांचा त्याला विरोध आहे. अटी व शर्तीनुसार महापालिकेला ना हरकत दाखला दिला होता. परंतु त्याचे पालन न करता महापालिकेने विश्वासघात केला आहे.

तसेच ग्रामस्थ व ग्रामपंचायतीचाही अपमान केला आहे. कचराडेपोमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. परिसरातील पाणीपुरवठा दूषित झाला आहे. नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. त्यामुळे हा कचरा डेपो कायमस्वरूपी बंद करावा. काही शेतकऱ्यांनी राष्ट्रीय हरित लवादाकडेही दाद मागितली आहे.

महापालिकेने केला विश्वासघात

ना हरकत दाखला देताना बुरुडगाव ग्रामपंचायतीने महापालिकेला अटी व शर्ती लागू केल्या होत्या. परंतु त्याचे पालन न करता महापालिकेने बुरुडगावचा विश्वासघात केला आहे. ग्रामपंचायत व ग्रामस्थांचा अपमान केला आहे, असेही ग्रामसभेच्या ठरावात नमूद करण्यात आले आहे. बुरुडगावला नळाद्वारे पाणीपुरवठा करावा, कचरा डेपोकडे जाणारा रस्ता तयार करावा, त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करावे, कचरा डेपोमध्ये हरित लवादाच्या निकषांचे पालन करावे आदी अटी व शर्ती लागू करण्यात आल्या होत्या.