मुंबईतील काही भागांत मंगळवारी पाणीपुरवठा बंद

काही परिसरात या दिवशी पाणीपुरवठा बंद राहणार आहे किंवा पाणी कमी दाबाने होणार आहे.

प्रतिनिधिक छायाचित्र

 

मुंबई : पालिकेतर्फे वेरावली जलाशय क्र. ३ चे भाग क्र. २ चे वांद्रे आऊटलेट वर असलेल्या १२०० मिलिमीटर व्यासाची झडप बदलण्याचे काम मंगळवार, १३ जुलैला सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत होणार आहे. त्यामुळे एच पश्चिम (वांद्रे पश्चिम), के पूर्व व के पश्चिम (अंधेरी पूर्व-पश्चिम) या तीन विभाग कार्यालयांच्या हद्दीतील काही परिसरात या दिवशी पाणीपुरवठा बंद राहणार आहे किंवा पाणी कमी दाबाने होणार आहे.

के-पश्चिम विभागात ‘गिलबर्ट हिल’ येथे दैनंदिन वेळेत, जुहू-कोळीवाडा येथे सकाळी ८ ते ९.१५ वाजेपर्यंत, तर ‘चार बंगला’ येथे दुपारी १२.१५ ते २.१० या कालावधीत कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. विलेपार्ले (पश्चिम), जे. व्ही. पी. डी., नेहरू नगर येथील पाणीपुरवठा खंडित राहील.

के पूर्व विभागात ‘विलेपार्ले’ (पूर्व), सहार मार्ग, ना. सी. फडके मार्ग, ए. के. मार्ग, गुंदवली गावठाण, तेली गल्ली, साईवाडी, जिवा महाले मार्ग, मोगरपाडा, नवीन नागरदास मार्ग, जुना नागरदास मार्ग येथे दैनंदिन वेळेत कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Water supply cut off in some parts of mumbai on tuesday akp

ताज्या बातम्या