नागरिकांचे हाल

डहाणू: डहाणू नगरपरिषदेच्या सुजल निर्मल अभियानांतर्गत मंजूर पाणी योजनेच्या तपासणीच्या कामासाठी नगर परिषदेच्या क्षेत्रात अनियमित पाणी पुरवठा होत असल्याने पाणी पुरवठा नियमित करण्याची मागणी डहाणूच्या नागरिकांनी केली आहे.

पाण्याच्या टाकीच्या दुरुस्तीच्या नावाखाली  डहाणू शहरवासियांना एकदिवसाआड पाणी मिळण्याची वेळ ओढवल्याने नागरिकांकडून संताप केला जात आहे. माजी नगराध्यक्ष मिहीर शहा यांनी मुख्याधिकारींना पाणी पुरवठा नियमित करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. दुरुस्तीची कामे लवकरातवलवकर पूर्ण करण्याच्या सुचना ठेकेदारास देण्यात अल्या आहेत असे प्रभारी  मुख्याधिकारी राहूल सारंग यांनी सांगीतले.

डहाणू शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी सुजल निर्मल अभियानआंतर्गत पाणी योजना मंजूर करण्यात आली. या योजनेत डहाणू शहरात सहा पाण्याचे जलकुंभ बांधण्यात आले. मात्र पाच वर्ष उलटुनही ३२ कोटीची पाणी योजना अपूर्णच राहिली आहे. ठेकेदार कामाकडे दुर्लक्ष करीत असल्याने ही योजना दिलेल्या मुदतीत पुर्ण झालेली नाही. परिणामी नळपाणी योजनेच्या दुरुस्तीच्या नावखाली काही भागात दोन तर काही भागात पाच दिवसाने पाणी सोडले जात आहे. नागरिकांना खाजगी   मध्ये पाणी विकत घ्यावे लागत आहे.त्यामुळे ही योजना लवकरात लवकर पूर्ण करुन डहाणू वासीयांचा पाणी पुरवठा नियमित करण्याची मागणी होत आहे.