कधी मिळाला होता एवढा वेळ… फॅमिलीसोबत एन्जॉय करायला… पुस्तकांच्या पानांमध्ये रमायला… घरात मुलांसोबत पेंटिंग करत बसायला… नाही ना??
कॅरम-बुद्धिबळ किंवा व्यापार असे गेम तर अडगळीच ठेवले होते ना आपण…
किती दिवसांनी तुम्ही मुलांसोबत क्राफ्टिंग करत बसलात?
गृहिणी नेहमीच रेसिपी करून पाहतात… पण नोकरीवर असणाऱ्या महिलांना-मुलांना तर रेसिपी करून बघण्यासाठी ही नामी संधीच नाही का? जे कधीच करून पाहिलं नाही.. अशा अचाट गोष्टीही तुम्ही करत असाल, हो ना?

एवढंच काय किती वर्षांनंतर तुम्हाला तुमच्या आवडत्या गोष्टी करण्यासाठी वेळ मिळाला कल्पना करा… करोनाच्या लढाईत तुम्ही घरात बसून हा असा लढा देणंही मोठी गोष्ट आहे… आम्हाला माहितेय… तुम्हीही करोनाशी अशा प्रकारे फाइट करत आहात…

तर तुमचा हा लढा तुमची ही फाइट येऊ द्या जगासमोर…

त्यासाठी आम्ही तुम्हाला ‘लोकसत्ता डॉट कॉम’चं (Loksatta.com) व्यासपीठ खुलं करतोय… We Fight Corona हा नवा उपक्रम सुरू करतोय…

तुम्हाला फक्त एकच करायचं…
तुम्ही करोनाशी फाइट करताना लॉकडाउनचा हा काळ कुटुंबासोबत कसा घालवता… कसे खेळता… कोणते गेम खेळता… कसे पेंटिंग करता… कोणते आर्ट्स करता… कोणती पुस्तकं वाचता… आणि हो… कोणत्या रेसिपी कशा करताय… ते फक्त व्हिडिओच्या स्वरूपात पाठवा….

तुमच्या या व्हिडिओंपैकी काही व्हिडिओ आम्ही लोकसत्ता डॉट कॉमवर, फेसबुक, युट्यूबवर शेअर करू…

त्यातून इतरांनाही मिळेल एक ऊर्जा… कारण लॉकडाउनमध्ये तुम्ही आहात पॉझिटिव्ह एनर्जीचं एक माध्यम…

करताय ना मग शेअर…
तर मग लागा कामाला…

फक्त एक करा… मोबाइल आडवा धरा… आणि मगच व्हिडिओ शूट करा…
तो व्हिडिओ आम्हाला आमच्या 9326870188 या व्हॉट्सअप नंबरवर पाठवा.

त्यातले अनेक प्रेरणादायी व्हिडिओ आम्ही प्रसिद्ध करू… तुम्हाला अन् तुमच्या कलेला सगळ्यांपर्यंत पोहोचवू…

व्हिडीओ पाठवताना पाळायचे नियम
१. व्हिडीओ किमान ३-५ मिनिटांचा असावा.
२. फक्त ओरिजनल व्हिडीओ पाठवा. युट्यूब, इन्स्टाग्राम किंवा फेसबुकच्या लिंक पाठवू नका.
३. व्हिडीओमध्ये सुरुवातीला तुमचं नाव व शहर सांगा
४. व्हिडीओमध्ये कोणत्याही प्रकारची गाणी, रेकॉर्डिंग, संगीत वापरू नका. जे काही असेल ते तुमचं स्वतःचं असेल, तेच शूट करून पाठवा.
(नियमांचे पालन केले गेले नसल्यास व्हिडीओ स्विकारले जाणार नाहीत, याची नोंद घ्या.)