नव्या पिढीला ‘भारत माता की जय’ बोलायला शिकवावं लागतं- भागवत

भारतमातेच्या विरोधात बोलणाऱ्यांची संख्या देशात वाढत असल्याचे यावेळी भागवत यांनी सांगितले

Mohan Bhagwat , RSS, JNU row, bharat mata ki jay, Loksatta, Loksatta news, Marathi, Marathi news
Mohan Bhagwat : याउलट भारतमातेच्या विरोधात बोलणाऱ्यांची संख्या देशात वाढत असल्याचे यावेळी भागवत यांनी सांगितले.

नव्या पिढीला ‘भारत माता की जय’ बोला हे शिकवायला लागते, असे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगितले. ते नागपूरमधील एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी भागवत यांनी सध्या देशभरात गाजत असलेल्या जेएनयू प्रकरणासंदर्भात अप्रत्यक्षपणे भाष्य करताना म्हटले की, आजकालच्या मुलांना भारत माता की जय बोला, हे शिकवायला लागते. या गोष्टी स्वयंप्रेरणेतूनच आल्या पाहिजेत. मात्र, सध्याच्या काळात तसे घडत नाही. याउलट भारतमातेच्या विरोधात बोलणाऱ्यांची संख्या देशात वाढत असल्याचे यावेळी भागवत यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: We have to tell new generation that tell speak bharat mata ki jay to new generation says mohan bhagwat