४ जून रोजी खासदार अमोल किर्तीकर जिंकले होते. मात्र रात्री उशिरापर्यंत घोळ सुरु होते. ६०० मतांनी जिंकले वगैरे समोर आलं. त्यानंतर ४८ मतांनी ते हरले असं समोर आलं. काल परवाकडेही बातम्या आणि पेपरच्या माध्यमांमधून वेगवेळे रिपोर्ट या संदर्भात समोर येत आहेत. आत फोन कोण घेऊन गेलं होतं? ओटीपी कुणाच्या मोबाइलवर आला? हे सगळे प्रश्न उपस्थित होत आहेत. असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. तसंच आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत महत्त्वाची मागणी केली आहे.

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

“अमोल कीर्तिकरांच्या सीटबाबत कोर्टाची लढाई सुरु होणारच आहे. कारण ही जागा आम्ही जिंकलो आहोत. हुकूमशाहीच्या विरोधात मुंबईकरांनी जो निकाल दिलाय तो जगजाहीर आहे. मात्र यात जी गडबड झाली आहे त्यातल्या टेक्निकल गोष्टी आम्ही मांडू इच्छितो. निवडणूक निकाल आणि निवडणूक आयोग हे पाहिलं तर तर निवडणूक आयोग म्हणजे इलेक्शन कमिशन नाही तर एंटरायली कॉम्प्रोमाईज्ड कमिशन आहे. एका पक्षाच्या सांगण्यावरुन ते काम करत आहेत. सगळी गडबड करुनही इंडिया आघाडीने चांगलं यश मिळवलं आहे. ही गडबड झाली नसती तर सरकार बदललं असतं. ” असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला.

arvind kejriwal low calorie diet allegation by delhi lg
Arvind Kejriwal : “अरविंद केजरीवाल जाणीवपूर्वक…”, तुरुंगातील आहारावरून नायब राज्यपाल वी.के. सक्सेना यांचा गंभीर आरोप!
Should women change their name after marriage
लग्नानंतर महिलांनी नाव बदलावं का? कायदा नेमकं काय सांगतो? वकिलांनी सांगितली नेमकी तरतूद!
hasan mushrif sambhaji raje chhatrapati. dispute over vishalgad encroachment
विशाळगड अतिक्रमण प्रकरणावरून हसन मुश्रीफ – संभाजीराजे यांच्यात शाब्दिक वाद
Dilip Parbhavalkar While in Drama Patra-Patri
Dilip Prabhavalkar: दिलीप प्रभावळकर यांच्या मनात श्रीराम लागूंच्या पत्र आठवणींचा दरवळ, ‘पत्रापत्री’च्या प्रयोगांची चर्चा
sunita Deshpande
आपुलकीचं नातं
aditya thackeray replied to ashish shelar
तेजस ठाकरेंचा ‘त्या’ व्हिडीओवरून आशिष शेलारांची टीका; आदित्य ठाकरेंनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले…
Tomb of Sand writerGeetanjali Shree
मातृभाषेत पुस्तक लिहून कमावले ‘आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक!’ पाहा कसा होता गीतांजली श्री यांचा प्रवास….
Inzamam Ul Haq Statement on Rohit Sharma
“तू आम्हाला शिकवू नकोस”, रोहितच्या ‘डोकं वापरा’ वक्तव्यावर इंझमाम उल हक भडकले; म्हणाले, “त्याला सांगा…”

अनिल परब यांनी काय म्हटलं आहे?

“४ जूनला जो निकाल लागला त्यात अमोल कीर्तिकर यांचा ४८ मतांनी पराभव झाला. हा पराभव संशयास्पद आहे. आम्ही या विरोधात कोर्टात जात आहोत. निवडणुकीची एक प्रक्रिया असते. त्याद्वारे निवडणूक होत असते. यावेळी मात्र निवडणूक प्रक्रियेला हरताळ फासण्यात आला आहे. १९ व्या फेरीनंतर ही प्रक्रिया डावलली गेली. निकाल जवळजवळ येत होते त्यावेळी पारदर्शकता बंद झाली. कुठल्याही मतदानाचा राऊंड पूर्ण झाल्यानंतर की घोषणा केली जाते. मतं किती मिळाली ते सांगितलं जातं. त्यानंतर दुसरा राऊंड सुरु होतो. १९ व्या फेरीपर्यंत हे सगळं बरोबर चाललं होतं. मात्र त्यानंतर गडबड करण्यात आली. पक्षाचे प्रतिनिधीही त्या ठिकाणी असतात. कारण पक्षांची मतं जेव्हा कळतात तेव्हा उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर त्याचा ताळा मांडला जातो. टेबलमध्ये आणि आमच्या प्रतिनिधींमध्ये जाणीवपूर्वक अंतर ठेवण्यात आलं. मात्र एआरओच्या टेबलवरुन वेगळ्याच संख्या पाठवले जात होते. मतदान संपल्यानंतर १७ सी नावाचा फॉर्म असतो. त्यात किती मतदान असतं ते पेटीवर लिहिलेलं असतं. त्यावर सगळ्यांच्या सह्या असतात. हा फॉर्म टॅली होतो. की मतपेटीतली मतं तशीच आहेत का? दुसरा प्रकार असतो १७ सी पार्ट टू. त्यात मतमोजणीच्या दिवशी फॉर्म भरायचा असतो आणि दोन्हीची सरासरी बघायची असते. यावेळी अर्ध्या लोकांना हे फॉर्म देण्यात आले. अर्ध्यांना दिलेच नाहीत. ६५० मतांचा फेरफार करण्यात आला आहे.” असा आरोप अनिल परब यांनी केला.

हे पण वाचा- “…तर एलॉन मस्कला निवडणूक अधिकारी वंदना सुर्यवंशींकडे शिकवणी लावावी लागेल”, राऊतांचा टोला

काय आहे हे प्रकरण?

लोकसभा निवडणुकीच्या निकालाला तेरा दिवस उलटूनही अद्यापही ठाकरे गटाचे अमोल किर्तीकर विरुद्ध शिंदे गटाचे रवींद्र वायकर यांच्यामधील निकालाचा मुद्दा चर्चेत आहे. शिवसेना शिंदे गटाचे मुंबई उत्तर पश्चिम मध्य लोकसभेचे उमेदवार रवींद्र वायकर यांचा विजय सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. रवींद्र वायकर यांनी अमोल किर्तीकर यांचा अवघ्या ४८ मतांनी पराभव केला. मात्र, यानंतर ठाकरे गटाकडून या मतमोजणीत गैरप्रकार झाल्याचा आरोप होतो आहे.

रवींद्र वायकर म्हणतात हा रडीचा डाव

रवींद्र वायकर यांच्या मेहुण्याविरोधात मतमोजणी केंद्रामध्ये मोबाईल नेल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात ठाकरे गटाच्या तक्रारीवरून गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. या सर्व प्रकरणावर आता रवींद्र वायकर यांनी प्रतिक्रिया देत शिवसेना ठाकरे गटावर पलटवार केला. “पराभव जिव्हारी लागल्यामुळे हा रडीचा डाव सुरू आहे”, अला हल्लाबोल वायकरांनी ठाकरे गटावर केला. या सगळ्या गोष्टी घडत असतानाच एलॉन मस्क यांनीही ईव्हीएममध्ये सहज फेरफार होऊ शकतो असं म्हटलं आहे.