राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार मागील काही काळापासून नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. अजित पवार यांनी अनेकदा आपण नाराज नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. पण शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी मोठं विधान केलं आहे. अजित पवार शिंदे गटात आले तर आम्हाला आनंद होईल, असं केसरकर म्हणाले आहेत. केसरकरांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण आलं आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

विरोधी पक्षनेते अजित पवार आणि भारतीय जनता पार्टीचे आमदार प्रवीण पोटे शनिवारी अमरावतीत एका कार्यक्रमानिमित्त एकाच मंचावर उपस्थित होते. यावेळी प्रवीण पोटे यांनी अजित पवारांबद्दल मोठं विधान केलं होतं. अजित पवारांनी पहाटेच्याऐवजी दुपारी शपथ घेतली असती, तर ते आता मुख्यमंत्री असते, असं विधान पोटेंनी केलं. पोटे यांच्या विधानाबाबत दीपक केसरकरांना विचारलं असता, अजित पवार शिंदे गटात आले तर आम्हाला आनंद होईल, असं विधान केलं आहे. ते सिंधुदुर्ग येथे पत्रकारांशी संवाद साधत होते.

Mohite-Patil, Mohite-Patil family revolt,
मोहिते-पाटील कुटुंबीयांचे २१ वर्षांनंतर पुन्हा बंड !
Why do Congress leaders join BJP chandrashekhar bawankule clearly talk about it
काँग्रेस नेते भाजपमध्ये का येतात? बावनकुळे यांनी स्पष्टच सांगितले…
Sharad Pawar Wardha tour
वर्धा : शरद पवार यांच्याकडे काँग्रेस नेत्यांच्या तक्रारी, पवार म्हणाले…
excitement in the NCP Congress After the announcement of candidature of Sunil Tatkare
रायगड : सुनील तटकरेंची उमेदवारी जाहीर झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उत्साह…

हेही वाचा- “…तर अजित पवार मुख्यमंत्री असते”, अजित पवार उपस्थित असलेल्या मंचावरून भाजपा आमदाराचं विधान

प्रवीण पोटेंच्या विधानावर भाष्य करताना दीपक केसरकर म्हणाले, “राजकीय नेत्यांची राजकारणापलीकडे जाऊन एकमेकांशी मैत्री असते. एकमेकांबद्दल आदर असतो. आम्हाला सगळ्यांना अजित पवारांबद्दल आदर आहे. अजित पवारही कुटुंबातील सदस्याप्रमाणे मोकळेपणाने बोलतात. त्यामुळे मला वाटतं की, प्रवीण पोटे यांनीही मैत्रीपोटी किंवा आदरापोटी ते विधान केलं असावं. अजित पवार आमच्या सगळ्यांबरोबर आले तर आम्हाला आनंदच होईल. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांची कशी घुसमट होतेय, हे सगळ्यांनी बघितलं आहे. त्यामुळे असा उमदा नेता आमच्याबरोबर आला तर का आवडणार नाही,” असं विधान केसरकर यांनी केलं आहे.