अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे पश्चिम किनारपट्टीवरील जिल्ह्य़ांमध्ये अतिवृष्टी व वादळाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने या संदर्भात प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे की, गोव्यापासून नैर्ऋत्येला सुमारे ४१० किलोमीटर आणि मुंबईपासून ६३० किलोमीटर अंतरावर अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. पुढील २४ तासांत तो उत्तरेकडे सरकेल, असा अंदाज आहे. त्यामुळे पश्चिम किनारपट्टीवरील जिल्ह्य़ांना अतिवृष्टी व वादळाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. या कालावधीत मच्छीमारांनी समुद्रात न जाण्याची, तसेच किनारपट्टीवरील वस्त्यांमध्ये सावधगिरी बाळगून आवश्यक उपाययोजनेची सूचना करण्यात आली आहे.