West Maharashtra Assembly Election Result Highlights : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी (२० नोव्हेंबर) राज्यात एकाच टप्प्यात मतदान पार पडले. राज्यात एकूण २८८ जागांसाठी सरासरी ६५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झालं. आता संपू्र्ण राज्याचे लक्ष निकालाकडे लागले आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राज्यातील अत्यंत महत्त्वाचा विभाग म्हणजे पश्चिम महाराष्ट्र. एकूण ७० मतदारसंघ असलेल्या पश्चिम महाराष्ट्र विभागात महाविकास आघाडी आणि विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलं यश मिळाले आहे. पण गेल्या काही वर्षात राजकीय समीरकरणं बदलल्यामुळे यंदा पश्चिम महाराष्ट्रात नेमकं काय घडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
West Maharashtra Assembly Election Results Highlights : पश्चिम महाराष्ट्रातील सर्व मतदारसंघातील राजकीय घडामोडींचा आढावा एकाच क्लिकवर.
West Maharashtra Vidhan Sabha Live Updates : माजी मंत्री शंकरराव गडाख पराभूत
‘लाडकी बहीण’, ‘बटेंगे तो कटेंगे’, ‘एक है तो सेफ है’ या मुद्द्यांसह प्रामुख्याने स्थानिक पातळीवर गटातटाचे राजकारण यामुळे यंदाची विधानसभा निवडणूक रंगली होती. तब्बल सहा माजी आमदारांनी बंडखोरी केली होती. मात्र, त्यातील कोणालाही विजय मिळाला नाही. माजी मंत्री शंकरराव गडाख यांनाही नेवासा मतदारसंघातून पराभव स्वीकारावा लागला. किमान सात मतदारसंघांतून बंडखोरी झाली होती. कोणत्याही बंडखोराला विजय मिळवता आला नाही.
West Maharashtra Vidhan Sabha Result Live : प्रमुख पराभूत उमेदवार
West Maharashtra Vidhan Sabha Result Live Updates : शरद पवारांचा प्रभाव कमी
प. महाराष्ट्रातील हे चारही जिल्हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मानणारे आहेत. पक्षफुटीनंतर त्यांनी या चारही जिल्ह्यांत मोठे आव्हान निर्माण केले होते. मात्र, सोलापूर वगळता त्यांच्या पक्षाला फारसा प्रभाव दाखवता आला नाही. सोलापुरात मात्र चार जागा जिंकून पवारांनी आपला दबदबा आजही कायम असल्याचे दाखवून दिले. इतर जिल्ह्यांत मात्र शरद पवार यांना प्रभाव दाखविता आला नाही.
West Maharashtra Assembly Election Results Live : प्रमुख विजयी उमेदवार
●शिवेंद्रसिंहराजे भोसले, सातारा (भाजप)
●सुधीर गाडगीळ, सांगली (भाजप)
●विश्वजित कदम, पलूस कडेगाव, काँग्रेस</p>
●हसन मुश्रीफ, कागल (राष्ट्रवादी काँग्रेस)
●महेश शिंदे, कोरेगाव (शिवसेना, एकनाथ शिंदे)
Nashik Vidhan Sabha Result Live : नाशिक शहरात भाजप तर, ग्रामीणमध्ये राष्ट्रवादीच ‘दादा’
West Maharashtra Vidhan Sabha 2024 Result Live : पश्चिम महाराष्ट्राच्या निकालांची प्रमुख वैशिष्ट्ये
एके काळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आणि पुरोगामी विचारांना साथ देणारा म्हणून ओळखला जाणारा पश्चिम महाराष्ट्राचा टापू महायुतीने या निवडणुकीत अक्षरश: काबीज केला आहे. हिंदुत्वाचा मुद्दा येथे चालल्याचे दिसले. महाविकास आघाडीतील काही दिग्गजांचा पराभव आणि केवळ दोन जागांपुरती उरलेली काँग्रेस ही दोन पश्चिम महाराष्ट्राच्या निकालांची प्रमुख वैशिष्ट्ये ठरली.
Ahmednagar Vidhan Sabha Result : राम शिंदे यांची फेर मतमोजणीची मागणी फेटाळली
कर्जत जामखेड विधानसभा मतदासंघातील मतमोजणीचा निकाल जाहीर झाला. रोहित पवार यांच्या विजयाची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी नितीन पाटील यांनी केल्यानंतर राम शिंदे यांची फेर मतमोजणीची मागणी केली. मात्र निवडणूक निर्णय अधिकारी यांनी ती नाकारली असे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले.
West Maharashtra Election Results 2024 : चांदगड मतदारसंघातून विजयी झालेल्या शिवाजी पाटील यांच्या विजयी रॅलीमध्ये घडला अपघात, काही लोक किरकोळ जखमी
West Maharashtra Election Results 2024 : चांदगड मतदारसंघातून विजयी झालेल्या शिवाजी पाटील यांच्या विजयी रॅलीमध्ये अपघात घडला. फटाक्यांवर गुलाल टाकल्यामुळे आगीचा भडका उडाला आणि या घटनेत काही लोक किरकोळ जखमी झाले. शिवाजी पाटील हे चांदगड मतदारसंघातून अपक्ष विजयी झाले आहेत.
West Maharashtra Election Results 2024 Live Updates: पश्चिम महाराष्ट्रात सर्वात धक्कादायक निकाल
West Maharashtra Election Results 2024 : दक्षिण कराड मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव पश्चिम महाराष्ट्रात सर्वात धक्कादायक निकाल मानला जातो.
Baramati Assembly constituency 2024 : अजित पवारांच्या प्रचारात लक्षवेधी ठरलेल्या गुलाबी जॅकेटची इनसाईड स्टोरी काय?
Pune Election Results 2024 Live Updates: बारामती मतदारसंघातून अजित पवारांनी दणदणीत विजय मिळवला. त्यांच्या विजयामागे त्यांनी केलेल्या प्रचाराचे खूप मोलाचे योगदान आहे. पण तुम्हाला माहितेय का अजित पवारांच्या प्रचारात लक्षवेधी ठरलेल्या गुलाबी जॅकेटची इनसाईड स्टोरी काय आहे?
Assembly Election Results Live : पुणे जिल्ह्यातून काँग्रेस हद्दपार; शरद पवारांच्या राष्ट्रवादीला अवघी एक जागा
पुणे जिल्ह्यातून काँग्रेस पक्ष पूर्णपणे हद्दपार झाला असून शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ एक जागा जिंकता आली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत, अविभाजित राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे जिल्ह्यात २१ पैकी १० जागा जिंकल्या होत्या, तर त्याचा मित्र पक्ष काँग्रेसने पुणे जिल्ह्यात ३ जागा जिंकल्या होत्या. तर भाजपने ८ जागा जिंकल्या होत्या. मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला जिल्ह्यात एकही जागा मिळाली नव्हती.
Ahmednagar Vidhan Sabha Result : अहिल्यानगर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे रोहित पवार एकमेव विजयी आमदार
मागील विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्यामध्ये वर्चस्व होते. मात्र या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नगर जिल्ह्यामधून हद्दपार झाला असता परंतु रोहित पवार यांच्या विजयामुळे या पक्षाचे अस्तित्व नगर जिल्ह्यामध्ये राहिले आहे.
Maharashtra Assembly Election Results 2024 : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा निकाल (११ जागांचे निकाल)
सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा निकाल (११ जागांचे निकाल)
भाजप-५, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष-४, शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष-१, शेकाप-१
१) अक्कलकोट
सचिन कल्याणशेट्टी, भाजप विजयी- एक लाख ४७ हजार ८९५
२) सिद्धाराम म्हेत्रे, काँग्रेस-९८ हजार ५३३
(सचिन कल्याणशेट्टी मताधिक्य-४९ हजार ५७२
२) सोलापूर दक्षिण
सुभाष देशमुख, भाजप विजयी-एक लाख १४ हजार ६००
अमर पाटील, शिवसेना ठाकरे गट-३९ हजार ०७२
सुभाष देशमुख मताधिक्य-७५ हजार ५२८
३) सोलापूर शहर उत्तर-
विजयकुमार देशमुख, भाजप विजयी-एक लाख १७ हजार २१५
महेश कोठे, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष-६२ हजार ६३२
विजयकुमार देशमुख मताधिक्य-५४ हजार ५८३
४) सोलापूर शहर मध्य
देवेंद्र राजेश कोठे, भाजप विजयी-एक लाख १० हजार २७८
हाजी फारुख शाब्दी, एमआयएम-६१ हजार ४२८
चेतन नरोटे, काँग्रेस-१६ हजार ३८५
देवेंद्र कोठे मताधिक्य-४८ हजार ८५०
५) पंढरपूर
समाधान आवताडे, भाजप विजयी-एक लाख २५ हजार १६३
भगीरथ भालके, काँग्रेस-एक लाख १६ हजार ७३३
अनिल सावंत, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष-१० हजार २१७
समाधान अवताडे मताधिक्य-८४३०
६) मोहोळ राखीव
राजू ज्ञानू खरे राष्ट्रवादी शरद पवार पक्ष विजयी-एक लाख १५ हजार ५४०
यशवंत माने, राष्ट्रवादी अजित पवार पक्ष-८५ हजार ८२२
राजू खरे मताधिक्य-२९ हजार ७१८
७) माढा
अभिजित पाटील, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष विजयी-एक लाख ३५ हजार ४१८
रणजित बबनराव शिंदे, अपक्ष-एक लाख ५०४७
मीनल साठे, राष्ट्रवादी अजित पवार पक्ष-१३ हजार २८०
अभिजीत पाटील मताधिक्य-३१ हजार ३७१
करमाळा
नारायण पाटील, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष विजयी-८७ हजार ६६८
संजय शिंदे, अपक्ष-६५ हजार २७७
दिग्विजय बागल शिवसेना शिंदे गट-३८ हजार १४९
नारायण पाटील मताधिक्य-२२ हजार ३९१
८) माळशिरस राखीव
उत्तम जानकर राष्ट्रवादी शरद पवार पक्ष विजयी-एक लाख २१ हजार ७१३
राम सातपुते, भाजप-एक लाख ८५६६
उत्तम जानकर मताधिक्य-१३ हजार १४७
९) सांगोला
डॉ. बाबासाहेब देशमुख, शेकाप विजयी-एक लाख १६ हजार २५६
शहाजीबापू पाटील शिवसेना शिंदे गट-९० हजार ८७०
दीपक साळुंखे, शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष-५० हजार ९६२
डॉ. बाबासाहेब देशमुख मताधिक्य-२५ हजार ३९६
११) बार्शी
दिलीप सोपल, शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष विजयी-एक लाख २२ हजार ३४७
आमदार राजेंद्र राऊत, शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष-एक लाख १६ हजार २२२
दिलीप सोपल मताधिक्य-६४७२
Kolhapur Assembly Election Result : कोल्हापुरात महायुतीचा १०-० ने विजय; धनंजय महाडिकांनी केली पोस्ट
कोल्हापुरात महायुतीचा १०-० असा महाविजय झाला आहे. सर्व १० विजयी उमेदवारांना खूप खूप शुभेच्छा, अशी पोस्ट धनंजय महाडिक यांनी मायक्रोब्लॉगिंग वेबसाइट एक्सवर केली आहे.
Maharashtra Vidhan Sabha results 2024 : शिवेंद्रराजे भोसले - महाराष्ट्रातून सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले आमदार
Satara Assembly Election Results : शिवेंद्रराजे भोसले (भाजप) हे ०१ लाख ४२ हजार १२४ मताने सातारा मतदारसंघातून विजयी झाले आहे. ते महाराष्ट्रातून सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले आमदार आहेत.
Satara Assembly Election Result 2024 : सातारा जिल्ह्यातील ८ मतदारसंघाचा निकाल
Satara Assembly Election Result 2024 : सातारा जिल्ह्यातील ८ मतदारसंघाचा निकाल खालीलप्रमाणे –
कराड दक्षिण- अतुल भोसले (भाजपा)
कराड उत्तर- मनोज घोरपडे (भाजपा)
सातारा- शिवेंद्रराजे भोसले ( भाजपा)
माण - जयकुमार गोरे, (भाजपा)
कोरेगाव- महेश शिंदे ( शिवसेना - एकनाथ शिंदे)
वाई- मकरंद जाधव ( राष्ट्रवादी काँग्रेस - अजित पवार)
फलटण - सचिन पाटील ( राष्ट्रवादी काँग्रेस - अजित पवार)
पाटण - शंभूराज देसाई, (शिवसेना - एकनाथ शिंदे)
Kolhapur Assembly Election Result 2024 : कोल्हापूर जिल्ह्यातील दहा मतदारसंघाचा निकाल खालीलप्रमाणे -
कोल्हापूर दक्षिण- अमल महाडिक ( भाजपा)
कोल्हापूर उत्तर-राजेश श्रीरसागर (शिवसेना शिंदे गट)
राधानगरी- प्रकाश आबिटकर
शाहुवाडी- विनय कोरे ( जनसुराज्य शक्ती पक्ष)
करवीर- चंद्रदीप नरके
इचलकरंजी- राहुल आवाडे ( भाजपा)
चंदगड- शिवाजी पाटील ( अपक्ष)
शिरोळ- राजेंद्र यड्रावकर
कागल- हसन मुश्रीफ ( राष्ट्रवादी काँग्रेस)
हातकणंगले- अशोकराव माने (जनसुराज्य शक्ती पक्ष)
West Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024 : कर्जत जामखेड मतदारसंघातून रोहित पवारांचा १२४३ मतांनी विजय
West Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024 : कर्जत जामखेड मतदारसंघातून रोहित पवारांचा १२४३ मतांनी विजय झाला आहे. या निकालावर राम शिंदे यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी फेरमोजणीची मागणी केली आहे.
Satara Vidhan Sabha Election Result 2024 : साताऱ्यात अभिजीत बिचुकलेंना मिळाली फक्त ५२९ मते
Satara Vidhan Sabha Election Result 2024 : यंदाच्या निवडणुकीत ‘बिग बॉस’ फेम अभिजीत बिचुकले यांनीदेखील उमेदवार म्हणून अर्ज भरला होता. आमदारकीपासून देशाच्या राष्ट्रपतीपदापर्यंत निवडणूक लढवून चर्चेत असणारे अभिजीत बिचुकले चौथ्यांदा सातारा जावळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. तसेच, पवार विरूद्ध पवार अशी चर्चेतील लढत असलेल्या बारामतीतूनही ते उभे होते. दोन्ही ठिकाणी त्यांचा पराभव झाला. त्यांना एकूण ५२९ मते मिळाली आहे.
Karjat Jamkhed Election Result 2024 : कर्जत जामखेडमध्ये मतमोजणी सुरूच, रोहित पवार मतमोजणी केंद्रावर दाखल
Karjat Jamkhed Election Result 2024 : कर्जत जामखेडमध्ये मतमोजणी सुरूच, रोहित पवार विरुद्ध राम शिंदे; कोण जिंकणार?
Complete List of Sharad Pawar NCP Winner candidate: राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला महाविकास आघाडीमध्ये २८८ पैकी ८६ मतदारसंघ मिळाले होते. काही मतदारसंघात शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये मैत्रीपूर्ण लढत झाली. तर ४० मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना पाहायला मिळाला. जाणून घ्या, शरद पवारांचे किती शिलेदार जिंकले आणि कोण पराभूत झाले?
Ajit Pawar First Reaction on Vidhasabha Election : "लाडकी बहीण योजनाच ठरली गेमचेंजर"
Ajit Pawar First Reaction on Vidhasabha Election : विधानसभा निकालांवर पहिली प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले, "आम्हाला लोकसभेच्या निवडणुकीत अपयश आलं. त्यातून आम्ही सावरण्याचा प्रयत्न केला. अर्थसंकल्प सादर करताना योजना आणल्या. लाडकी बहीण योजना गेमचेंजरच ठरली. त्यामुळे सगळे विरोधक उताणे पडले. आता आमच्यावरची जबाबदारी वाढली आहे"
Karad-south Vidhan Sabha Election Result 2024 Live: कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा दारूण पराभव झाला आहे. भाजपाचे भाजपाचे डॉ. अतुलबाबा भोसले हे या मतदारसंघातून विजयी ठरले आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण हे यावेळी तिसऱ्यांदा कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीला उभे राहिले होते. याआधी २०१४ आणि २०१९ साली त्यांनी निसटता विजय प्राप्त केला होता. २०१९ साली भाजपाचे उमेदवार अतुल भोसले यांच्याविरोधात सहा हजारांच्या मताधिक्याने पृथ्वीराज चव्हाण विजयी झाले होते. तर २०१४ साली काँग्रेसचे बंडखोर नेते विलास पाटील-उंडाळकर यांचा चव्हाण यांच्याविरोधात १६ हजार मतांनी पराभव झाला होता. यावेळी पाटील उंडाळकर आणि चव्हाण एकत्र आले. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांना विजयाची खात्री वाटत होती. परंतु, त्यांचा पराभव झाला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ राखीव मतदार संघात काँग्रेसचे राजू ज्ञानू खरे हे निवडून आले. त्यांनी आपले प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे विद्यमान आमदार यशवंत विठ्ठल माने यांचा ३० हजार १९७ मतांच्या फरकाने पराभव केला. संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात काँग्रेसकडून एकमेव विजयी झालेले राजू खरे यांना एक लाख २५ हजार ८३३ (५४.०६ टक्के) मिळाली. तर प्रतिस्पर्धी यशवंत माने यांना ९५ हजार ६३६ (४१.०८ टक्के) मते पडली. मोहोळ मतदार संघात तेथील वजनदार नेते माजी आमदार राजन पाटील-अनगरकर यांनी पराभूत यशवंत माने यांच्या पाठीशी संपूर्ण ताकद उभी केली होती. परंतु त्यांच्या साम्राज्याला धक्का बसला आहे.
Vidhan Sabha Election Results 2024 : अजित पवार यांनी आमदार चेतन तुपे तर शरद पवार यांनी माजी महापौर प्रशांत जगताप यांना उमेदवारी दिली होती. अजित पवार यांनी आमदार चेतन तुपे यांना तर शरद पवार यांनी माजी महापौर प्रशांत जगताप यांना उमेदवारी दिली होती. अखेरच्या फेरीमध्ये चेतन तुपे यांनी आघाडी घेत सहा हजार मते प्रतिस्पर्धी उमेदवार प्रशांत जगताप यांच्यापेक्षा अधिक मिळविली. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निकाल जाहीर केल्यानंतर यावर आक्षेप घेत प्रशांत जगताप यांनी या मतदार संघातील मतांची फेर मोजणी करण्याची मागणी केली आहे.
.
Ahilyanagar Assembly Election 2024 Result Update : अहिल्यानगर शहरमधून संग्राम जगताप विजयी
Ahilyanagar Assembly Election 2024 Result : अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते संग्राम जगताप विजयी झाले आहे तर महाविकास आघाडीचे नेते अभिषेक कळमकर यांचा पराभव झाला आहे.
Rajapur Assembly Constituency Election 2024 Result : राजापूर विधानसभा अंतिम निकाल
राजापूर विधानसभा मधून १९९८६ मतांनी किरण सामंत विजयी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांचा पराभव
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी (२० नोव्हेंबर) राज्यात एकाच टप्प्यात मतदान पार पडले. राज्यात एकूण २८८ जागांसाठी सरासरी ६५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झालं. आता संपू्र्ण राज्याचे लक्ष निकालाकडे लागले आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राज्यातील अत्यंत महत्त्वाचा विभाग म्हणजे पश्चिम महाराष्ट्र. एकूण ७० मतदारसंघ असलेल्या पश्चिम महाराष्ट्र विभागात महाविकास आघाडी आणि विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलं यश मिळाले आहे. पण गेल्या काही वर्षात राजकीय समीरकरणं बदलल्यामुळे यंदा पश्चिम महाराष्ट्रात नेमकं काय घडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.