scorecardresearch

“अमित शहा यांच्या मेळाव्याने कोल्हापूर, हातकणंगले लोकसभा विजयी संकल्पाची नांदी होणार”; मकरंद देशपांडे यांचे मत

भाजपाने महाराष्ट्रातील १८ लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्र्यांचा लोकसभा प्रवास उपक्रम सुरु केला आहे. यामध्ये अमित शहा यांचाही समावेश आहे.

West Maharashtra Union Minister of BJP Makarand Deshpande
भाजपाचे पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने एक वर्षापासूनच तयारी सुरू केली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा १९ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मेळाव्याने कोल्हापूर, हातकणंगले लोकसभा विजयी संकल्पाची नांदी होणार आहे, असे मत भाजपाचे पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे यांनी गुरुवारी व्यक्त केले.

हेही वाचा- आव्हाडांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी; अजित पवारांची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले, “कुणी सुपारी…”

भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे हे होते. खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार सुरेश हाळवणकर, आमदार अमल महाडिक, महानगराध्यक्ष राहुल चिकोडे, सांगली जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख प्रमुख उपस्थित होते.

हेही वाचा- कोल्हापुरातील महालक्ष्मी महाउत्सव वादात; महापालिकेचे संयोजकांना खुलासा करण्याचे आदेश

भाजपाने महाराष्ट्रातील १८ लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्र्यांचा लोकसभा प्रवास उपक्रम सुरु केला आहे. यामध्ये अमित शहा यांचाही समावेश आहे. ते कोल्हापुरात मेळाव्याला संबोधित करणार आहेत. रात्री बारा विधानसभा मतदारसंघाच्या गाभा पथकासोबत बैठक घेणार आहेत, असे यावेळी सांगण्यात आले. स्वागत संघटन मंत्री नाथाजी पाटील यांनी केले. आभार सरचिटणीस विठ्ठल पाटील यांनी मानले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-02-2023 at 20:07 IST