कराड, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नगर : एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे प. महाराष्ट्रातील शिवसेना कोलमडून गेली आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूरमध्ये शिवसेनेचे असलेले पाचही आमदार या बंडात सहभागी झाले आहेत. यामध्ये गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांचाही समावेश आहे. तसेच या विद्यमान लोकप्रतिनिधींसह पक्षाचे अनेक माजी आमदार, पदाधिकारीदेखील सध्याच्या या फुटीच्या स्थितीत या बंडावर स्वार झाले आहेत.  कोल्हापूर जिल्ह्यात असे पाच माजी आमदार असून ते या गोंधळाच्या स्थितीत गोव्याच्या सहलीवर गेले आहेत. दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यात असलेले पक्षाच्या दोन्ही खासदारांनी मात्र आपण ठाकरेंबरोबर राहणार असल्याचे जाहीर केल्याने शिवसेनेसाठी ती जमेची बाजू आहे.

पश्चिम महाराष्ट्रातून शंभूराज देसाई (पाटण), अनिल बाबर (खानापूर), महेश शिंदे (कोरेगाव), शहाजी बापू पाटील (सांगोला), प्रकाश आबिटकर (गडिहग्लज) हे शिवसेनेचे पाच आमदार निवडून आले. हे सर्व आमदार सध्या एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. यामध्ये सातारा जिल्ह्यातील शंभूराज देसाई आणि महेश शिंदे या दोन्ही आमदारांसमवेत त्यांचे पदाधिकारी देखील आता बंडाच्या पवित्र्यात आहेत. या मागे आघाडीची त्यातही राष्ट्रवादीची साथ सोडून शिवसेनेने भाजपबरोबर सरकार बनवावे असे या गटाचे म्हणणे आहे.

Nashik, Chhagan Bhujbal, dada bhuse,
नाशिकच्या जागेवरून आजी-माजी पालकमंत्र्यांमध्ये वर्चस्वाची लढाई
Nepotism in four out of ten Lok Sabha constituencies in Vidarbha by all political parties including bjp
विदर्भातील सर्वपक्षीय घराणेशाही, भाजपही मागे नाही
Raigad Lok Sabha
शिवसेनेपाठोपाठ भाजपची तटकरे विरोधाची तलवार म्यान
sunetra pawar contesting lok sabha election
मोले घातले लढाया : अस्तित्वाची लढाई

सांगली जिल्ह्यात मुळात शिवसेनेचा फारसा विस्तार झालेला नाही. पक्षाचे एकमेव आमदार अनिल बाबर हे खानापूर मतदारसंघातून स्वत:च्या बळावर निवडून आले आहेत. मात्र सरकारकडून होत असलेली उपेक्षा, पक्ष नेतृत्वासोबत संवादाचा अभाव यामुळे त्यांची सुरुवातीपासूनच नाराजी व्यक्त होत होती. दरम्यान मागील निवडणुकीत तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार असलेले अजितराव घोरपडे हेही केवळ युतीतील जागा वाटपातून भाजपची जागा नसल्याने सेनेत गेलेले. तेही आता पुन्हा भाजपकडे परतण्याची शक्यता आहे.

माजी आमदार गोव्यात

कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे एकमेव आमदार प्रकाश आबिटकर व शिवबंधन बांधलेले आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर हे दोघे नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत आहेत. शिवसेनेमध्ये भूकंप झाला असताना सेनेचे पाच माजी आमदार गोवा सहलीची मजा लुटत असल्याने त्यांची भूमिका संशयास्पद ठरली आहे. दोन्ही खासदारांनी बुधवारी वर्षांवर हजेरी लावली. मात्र इचलकरंजीतील खासदारांचे समर्थक ठाकरे यांच्या समर्थन आंदोलनात दिसले नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. निधी वाटप आणि मतदारसंघातील विधानसभेची समीकरणे लक्षात घेऊन आबिटकर हे शिंदे यांच्याबरोबर आहेत. त्यांचे बंधू अर्जुन आबिटकर यांनी मात्र आमदार आबिटकर हे उद्धव ठाकरे यांच्याबरोबर राहणार असल्याचे सांगत आहेत. आमदार आबिटकर यांचा संपर्क होत नसल्याने त्यांची नेमकी भूमिका कोणती हे कळावयास मार्ग नसल्याने संभ्रम आहे. अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिवबंधन बांधल्यानंतर त्यांना ठाकरे यांनी पाच खात्यांचे राज्यमंत्री केले. तरीही ते शिंदे यांच्यासमवेत गेल्याने तर्कवितर्क व्यक्त होत आहेत.

सोलापूरमध्ये चार जिल्हाप्रमुख 

सोलापूर जिल्ह्यातील सेनेचे एकमेव आमदार अ‍ॅड. शहाजी पाटील हे बंडात सामील झाले आहेत. शिवाय पूर्वी शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख असलेले आता मराठवाडय़ातील आमदार असलेले तानाजी सावंत यांनीही शिंदे यांच्याबरोबर जाणे पसंत केले आहे. जिल्ह्यात सेनेचे चार जिल्हाप्रमुख आहेत. सध्या तरी यापैकी कोणीही पक्षाच्या पडत्या काळात सक्रिय झाल्याचे दिसत नाही. दरम्यान मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेत प्रवेश करत निवडणूक लढवलेले दिलीप सोपल, रश्मी बागल, दिलीप माने तसेच दक्षिण सोलापूरचे माजी आमदार रतिकांत पाटील ही मंडळीही शिवसेनेत असूनही नसल्यासारखीच आहेत. प्राप्त परिस्थितीत त्यांची भूमिका गुलदस्त्यातच आहे. करमाळय़ाचे माजी आमदार नारायण पाटील हे शिवसेनेत असूनही मोहिते-पाटील गटामुळे भाजपच्या वाटेवर जाऊ शकतात.

गडाख सेनेबरोबर:

नगर जिल्ह्यात शिवसेनेच्या पक्ष चिन्हावर निवडून आलेला एकही आमदार नाही. परंतु विधानसभा निवडणुकीनंतर अपक्ष म्हणून निवडून आलेले शंकरराव यशवंतराव गडाख यांनी शिवसेनेत प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना लगेच जलसंधारण खात्याचे मंत्रिपद बहाल केले. याशिवाय शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या पक्ष चिन्हावर निवडून आलेले परंतु पूर्वाश्रमीचे भाजप आमदार असलेले खासदार सदाशिव लोखंडे असे दोनच लोकप्रतिनिधी आहेत. हे दोघेही मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी निष्ठा ठेवून असल्याचे चित्र आहे.