scorecardresearch

Premium

सातारा : महाबळेश्वरमध्ये साडेसहा कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी जप्त

व्हेल माशाच्या उलटीच्या तस्करी प्रकरणी महाबळेश्वरच्या माजी नगरसेवकासह तिघांना सातारा पोलिसांनी व वनविभागाने मेढा महाबळेश्वर रस्त्यावर पाठलाग करून अटक केली.

Whale fish Vomiting seized Mahabaleshwar
सातारा : महाबळेश्वरमध्ये साडेसहा कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी जप्त (image – pixabay/representational image)

वाई : व्हेल माशाच्या उलटीच्या तस्करी प्रकरणी महाबळेश्वरच्या माजी नगरसेवकासह तिघांना सातारा पोलिसांनी व वनविभागाने मेढा महाबळेश्वर रस्त्यावर पाठलाग करून अटक केली. जप्त केलेल्या व्हेल माशाच्या उलटीचं वजन सुमारे साडेसहा किलो असून त्याची किंमत साडेसहा कोटी रुपये आहे.

सातारा वन विभागाचे उपवनसंरक्षक भारद्वाज, सहाय्यक वनसंरक्षक महेश झांजुर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली महाबळेश्वर येथील परिक्षेत्र वन अधिकारी महांगडे यांना सोमवारी रात्री एक वाजता व्हेल माशाच्या उलटीची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली होती. साताऱ्यातील मेढा-महाबळेश्वर रस्त्यावर कारवाई करत ही उलटी जप्त करण्यात आली. पोलिसांनी पाठलाग करुन आरोपींना ताब्यात घेतलं.

mumbai high court, district collector of kolhapur, building of farmers cooperative union, mumbai high court slams district collector of kolhapur
कोल्हापूर : महालक्ष्मी मंदिराशेजारील वास्तू अधिग्रहण; शेतकरी संघाची जीत, जिल्हा प्रशासनाची हार
955 rare species tortoise puppies seized
डीआरआय’ची कारवाई : दुर्मीळ प्रजातीच्या कासवांची ९५५ पिल्ले ताब्यात
chital, Chital injured in collision with unknown vehicle gondiya
गोंदिया : अज्ञात वाहनाच्या धडकेत चितळ जखमी
Nagpur famous Black Marbat
नागपूरची प्रसिद्ध काळी मारबत, काय आहे इतिहास? जाणून घ्या

हेही वाचा – “ती नोटीस नव्हे, कारवाई आहे”, बावनकुळेंच्या ‘त्या’ विधानावर पंकजा मुंडेंचं उत्तर

हेही वाचा – “मला गोपीनाथ मुंडेंपेक्षा जास्त संघर्ष करावा लागत आहे, कारण…”, पंकजा मुंडेंचं बेधडक वक्तव्य

जप्त केलेल्या व्हेल माशाच्या उलटीचं वजन सुमारे साडेसहा किलो असून त्याची किंमत साडेसहा कोटी आहे. या प्रकरणी महाबळेश्वरचे माजी नगरसेवक प्रकाश पाटील यांच्यासह संतोष खुशालचंद्र जैन रा. रत्नागिरी संजय जयराम सुर्वे रा. मेढा अनिल अर्जुन ओंबळे रा. बोंडारवाडी ता. जावळी यांना अटक करण्यात आली आहे. व्हेल माशाच्या उलटीला आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी आहे. वन्यजीव अधिनियमानुसार त्याच्या हाताळणी विक्रीवर प्रतिबंध घालण्यात आले आहे. ही उलटी म्हणजे अ‍ॅम्बरग्रीस राखाडी किंवा काळ्या रंगाचा घन पदार्थ असतो. दगडासारखा दिसणारा हा पदार्थ मेणासारखा असतो. औषधे, उच्च दर्जाची आणि किमती अत्तरे, सेंट तयार करण्यासाठी या उलटीचा वापर होत असतो. त्यांना आज मंगळवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Whale fish vomiting worth six and a half crore seized in mahabaleshwar ssb

First published on: 26-09-2023 at 20:22 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×