देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेस नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या लातूरमधील “देवघर” या निवासस्थानी त्यांच्या चुलत भावाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. हनमंतराव पाटील (वय ८५) असं त्यांचं नाव आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली. शिवराज पाटील चाकूरकर यांचे सख्खे चुलत बंधू हनुमान पाटलांनी आत्महत्या केली तेव्हा नेमकं काय घडलं त्याचा हा आढावा…

चंद्रशेखर उर्फ हनमंतराव पाटील चाकूरकर लातूर शहरातील आदर्श कॉलनी भागात राहत होते. ते शिवराज पाटील चाकूरकर यांचे चुलत भाऊ आहेत. ते दररोज सकाळी फिरायला बाहेर जायचे. फिरून आल्यानंतर ते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या घरी येत आणि चहा पाणी झाल्यावर तेथेच पेपर वाचत बसायचे. यानंतर बाजूलाच असलेल्या स्वतःच्या घरी जात असत. ही त्यांची अनेक वर्षांपासूनची सवय होती.

Mallikarjun Kharge criticizes Dalit oppression in Narendra Modi Maharashtra state
मोदींच्या राज्यात दलितांवर अत्याचार; मल्लिकार्जुन खरगे यांची टीका
kalyan woman gudi making business marathi news,
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी कल्याणची गुढी
latur lok sabha marathi news, archana patil joined bjp marathi news, shivraj patil chakurkar marathi news
शिवराज पाटील यांच्या स्नुषेच्या भाजप प्रवेशाने लातूरमधील राजकीय गणिते बदलली
chetan narke, kolhapur lok sabha, chetan narke shivsena
हातकणंगलेतून लढण्याचा शिवसेनेच्या प्रस्तावाला नकार; कोल्हापुरात लढणारच – डॉ. चेतन नरके

आत्महत्येच्यावेळी शिवराज चाकुरकरांचा मुलगा घरात उपस्थित

शिवराज पाटील चाकूरकर यांच्या कुटुंबातील बहुतांश लोक अगदी कमी वेळा लातूरमधील निवासस्थानी असायचे. रविवारी (५ मार्च) शिवराज पाटील चाकूरकर यांचे चिरंजीव शैलेश पाटील हे सकाळी घरातच होते. नियमितप्रमाणे हनमंतराव पाटील चाकूरकर हे घरात आले. त्यानंतर शैलेश चाकुरकर यांनी त्यांना चहा घ्या मी आवरून येतो असं सांगून ते गेले.

गोळी झाडल्याचा आवाज झाला अन्…

काहीवेळाने घरात गोळी झाल्याचा आवाज झाला. घरातील नोकर आणि शैलेश पाटील धावत हॉलमध्ये आले. तेव्हा त्यांना हनमंतराव पाटील चाकूरकर हॉलमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. या घटनेची माहिती मिळताच लातूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला.

सततच्या आजारपणाला कंटाळल्याची माहिती

हनमंतराव पाटील चाकूरकर हे वडिलोपार्जित शेती करायचे. त्यांना दोन मुले आणि दोन मुली आहेत. या सर्वांची लग्ने झाली आहेत. ते सध्या एका मुलाबरोबर चाकूरकर यांच्या घराच्या बाजूला असलेल्या फ्लॅटमध्ये राहत होते. वयोमानाप्रमाणे त्यांना अनेक शारीरिक व्याधी होत्या. ते सततच्या आजारपणाला कंटाळल्याचंही सांगितलं जात आहे.

घरात सून, मुलगा आणि नातवंडे असल्यामुळे त्यांनी फारसं कुणी नसणाऱ्या शिवराज चाकुरकरांच्या घरात आत्महत्या केल्याचा अंदाजही व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा : सामाजिक कार्यकर्त्याचा न्यायासाठी पोलीस ठाण्यात आत्मदहनाचा प्रयत्न; अंगावर पेट्रोल ओतून घेतले आणि…

हनमंतराव पाटील चाकूरकर याचे चिरंजीव ॲड. लिंगराज पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, हनमंतराव पाटील चाकूरकर यांची ‘बायपास सर्जरी’ झाली होती. अशातच त्यांना इतरही अनेक व्याधी जडल्या होत्या. या सततच्या आजारपणाला ते कंटाळून गेले होते. त्यातून हे कृत्य केले असावे.

आत्महत्येआधी अनेकांना ‘गूड बाय’ मेसेज

विशेष म्हणजे रविवारी सकाळी आत्महत्या करण्याआधी हनमंतराव चाकूरकर यांनी स्वतःच्या मोबाईलमधील परिचित असलेल्या अनेकांना टेक्स्ट मेसेज करत ‘गूड बाय’ म्हटलं होतं. काहीवेळाने ‘गूड बाय’ असं व्हॉट्सअप स्टेटसही ठेवलं. त्यानंतर त्यांनी स्वतःच्या परवानाधारक पिस्तुलातून गोळी झाडून आत्महत्या केली.