Premium

Video : जागा वाटपाबाबत काँग्रेसचं काय ठरलं? बैठकीनंतर अशोक चव्हाणांनी स्पष्टच सांगितलं!

जागावाटपाचा हा मुद्दा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असतानाच काँग्रेसने यासंदर्भात आज बैठक घेतली. या बैठकीनंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन बैठकीतील मुद्द्यांबाबत सविस्तर माहिती दिली.

What has the Congress decided on seat allocation Ashok Chavan said clearly after the meeting
जागावाटपावर अशोक चव्हाण काय म्हणाले? (फोटो – महाराष्ट्र काँग्रेस ट्विटर)

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीयांकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही मित्र पक्ष यंदा पहिल्यांदाच एकत्रित निवडणूक लढवणार असल्याने जागावाटप कसे होणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे. जागावाटपाचा हा मुद्दा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असतानाच काँग्रेसने यासंदर्भात आज बैठक घेतली. या बैठकीनंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन बैठकीतील मुद्द्यांबाबत सविस्तर माहिती दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“आप-आपल्या जागावाटपासंदर्भात भूमिका मांडावी, जेणेकरून जागेची निश्चिती करता येईल. त्याअनुषंगाने काँग्रेसने जागेसंदर्भात असा निर्णय घेतला आहे किमान त्या त्या जिल्ह्यातील प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे हे जाणून घेणे महत्त्वाचं आहे. देशात झपाट्याने राजकीय परिस्थिती बदलत आहे. विद्यमान मोदी सरकारच्या विरोधात वातावरण आहे. त्याला बळ देण्याचं काम कर्नाटकच्या निकालाने केलं आहे. आज आणि उद्या दोन दिवस एकंदरीत राज्यातील राजकीय परिस्थिती, वस्तुस्थिती काय आहे, त्या त्या मतदारसंघातील लोकांचं काय म्हणणं आहे, कोणत्या मुद्द्यासंदर्भात विषय आहे, जनरल फिडबॅक घेण्याचं काम सुरू आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग, ठाणे, धुळे, नंदूरबार या चार मतदारसंघातील चर्चा सकाळपासून सुरू झाली आहे”, अशी माहिती अशोक चव्हाण यांनी दिली.

हेही वाचा >> ‘या’ खासदाराचं नाव ऐकताच संजय राऊत ऑन कॅमेरा थुंकले, नेमकं काय घडलं वाचा!

“दोन दिवसांच्या बैठकीत साधक बाधक चर्चा होऊन काय चित्र आहे ते समोर येतंय हळूहळू. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीचा कार्यकर्ते, नेत्यांच्या माध्यमांतून दोन दिवस आढावा घेतला जाणार आहे. निवडणुका लढल्या जातात. बऱ्याचवेळा देशपातळीवरील विषय असतात. अनेकदा लोकल पातळीवर विषय असतात. लोकल फॉर व्होकल हा विषय आपण कर्नाटकात अनुभवला. लोकल विषयांवर प्रभावीपणे प्रचार केल्यानंतर, लोकांच्या मनातील सरकार कसं असलं पाहिजे, त्यांना भेडसावणारे प्रश्न काय आहेत यासंदर्भात प्रचार व्हावा अशी लोकांची इच्छा असते. राष्ट्रीय विषयांवर बोललेच पाहिजे. पण स्थानिक विषयांकडे पाहिलं पाहिजे. प्रत्येकाच्या मतदारसंघात काय म्हणणं आहे, काय केलं पाहिजे, यावर चर्चा झाली. महाराष्ट्राच्या राजधानीत येणारे विषय, स्थानिक पातळीवरचे विषय यात तफावत असू शकते. त्यामुळे हा विषय सुद्धा चर्चेत आहेत की कोणते विषय घ्यायचे आहेत”, असं अशोक चव्हाण म्हणाले.

हेही वाचा >> Video: “शिंदेंचं सिंहासन लवकरच…” मुख्यमंत्री आणि पवारांच्या भेटीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “महाराष्ट्रातील राजकारण…”

“दोन दिवसांच्या चर्चेनंतर जागेविषयीचा निर्णय घेतला जाईल. कोणत्या पक्षाने, विशेषतः काँग्रेसने कोणत्या जागेवर दावा केला पाहिजे? हे ठरवलं जाणार आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी राहिली पाहिजे. म्हणजेच मतांचं विभाजन टाळता येईल. ओपिनिअन पोल यायला सुरुवात झाली आहे. अर्थात परिस्थितीनुसार पोल बदलत जातात. आजची परिस्थिती लक्षात घेतली तर तिन्ही पक्षांनी एकत्र राहून निवडणुका लढवल्या तर क्षमता असलेल्या पक्षाला जागा दिल्या गेल्या पाहिजे असा सर्वसाधारण कल आहे. आकडा किती होईल, काय होईल हे सांगता येत नाही, असंही अशोक चव्हाणांनी स्पष्ट केलं.

“चर्चा झाल्यानंतर पुढचं पाऊल असणार आहे की जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांच्या बैठका घेतल्या जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील प्रमुखांना एकत्र बसवून जबाबदारी निश्चित करायचं ठरवणार आहोत. एकूणच चर्चेची सुरुवात अशी केलेली आहे, असं अशोक चव्हाण म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-06-2023 at 13:42 IST
Next Story
‘शिरूर’ मध्ये अनेक इच्छुक…अजित पवार म्हणाले, ‘मग बिघडले कुठे?’