सांगली : विधानसभा निवडणूक आली असल्याने सर्वच पक्षात ताक घुसळल्यासारखी स्थिती निर्माण होईल, असे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी रविवारी मिरजेत सांगितले. राष्ट्रवादी, शिवसेनेचे दोन पक्ष झाल्याने उमेदवारांची रेलचेल असेही ते म्हणाले. मिरजेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून बसविलेल्या अद्यावत एमआरआय मशीनचे उद्घाटन मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते व पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली झाले. त्यावेळी माध्यमांशी ते बोलत होते. हेही वाचा - Sujata Saunik:महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक, इतिहासात पहिल्यांदाच महिला अधिकाऱ्याची निवड हेही वाचा - “विधानसभेला मी त्या उमेदवारांची नावं घेऊन पाडायला सांगणार”, मनोज जरांगेंचा रोख कोणाकडे? काही आमदार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील व पक्षाध्यक्ष शरद पवार यांना भेटत आहेत. याबाबत विचारले असता ते म्हणाले, शिवसेना, राष्ट्रवादीचे दोन पक्ष, भाजप, कॉंग्रेस, आरपीआय, बहुजन वंचित असे अनेक पक्ष आहेत. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने ताक घुसळल्यासारखी घुसळण होऊन उमेदवारांची रेलचेल होईल. लोकसभेच्या निकालावरुन विधानसभेचा अंदाज बांधणे चुकीचे ठरेल, कारण प्रश्न वेगवेगळे आहेत.