जिल्ह्यांचे पालकमंत्री कधी घोषित होणार? उदय सामंतांनी दिले संकेत

विविध जिल्ह्यांचे पालकमंत्री कधी नेमण्यात येतील? याबाबत शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी सूचक विधान केलं आहे.

जिल्ह्यांचे पालकमंत्री कधी घोषित होणार? उदय सामंतांनी दिले संकेत
संग्रहित छायाचित्र

महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन झाल्यानंतर तब्बल ४० दिवसांनी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला आहे. भाजपा आणि शिंदे गटाकडून प्रत्येक ९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. मंत्रीमंडळ विस्तार झाला असला तरी अद्याप खातेवाटप करण्यात आली नाही. तसेच विविध जिल्ह्यात पालकमंत्रीही नेमण्यात आले नाहीत. यानंतर आता शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी सूचक विधान केलं आहे.

राज्याच्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप लवकरच केलं जाईल, अशी माहिती त्यांनी दिली आहे. मात्र, खातेवाटप नेमका कधी होणार? याबाबत निश्चित कालावधी सांगितला नाही. पण पालकमंत्री नेमण्याबाबत त्यांनी संकेत दिले आहे. आज रात्री किंवा उद्या सकाळी पालकमंत्र्यांची घोषणा केली जाईल, अशी माहिती सामंतांनी दिली आहे. ते रत्नागिरीच्या पत्रकारांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधत होते.

हेही वाचा- मोठी बातमी! ठाकरे-शिंदे सत्तासंघर्षावरील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुन्हा लांबणीवर

खरं तर, शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक वेगवान घडामोडी घडल्या आहेत. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं असून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार अस्तित्वात आलं आहे. पण ठाकरे गटाकडून विविध प्रकारच्या याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्याने मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात अडचणी निर्माण होत होत्या. अखेर ४० दिवसांनंतर शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. मात्र, अद्याप खातेवाटप करण्यात आलं नाही.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
“आतापर्यंत शांत होतो, पण…” पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावरून संजय राठोड यांचा गंभीर इशारा
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी