Ajit Pawar Passes Away महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बुधवारी अपघाती निधन झालं. त्यांचं विमान बारामतीजवळ लँड करत असताना क्रॅश झालं आणि विमानाचा स्फोट झाला. यात अजित पवार आणि इतर पाच जणांचा मृत्यू झाला. ज्यानंतर महाराष्ट्र हळहळला. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे, शरद पवार, सुनेत्रा पवार हे सगळे दिल्लीत होते. अजित पवारांच्या अपघाती मृत्यूच्या बातमीनंतर या सगळ्यांनी बारामती गाठली.

सुप्रिया सुळे विठ्ठलदादा मणियार यांच्या गळ्यात पडून रडल्या

सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार बारामतीत आले त्यावेळी तिथं त्यांचे नातेवाईक राणाजगतिसिंह पाटील तिथं उपस्थित होते. यावेळी सुप्रिया सुळे या विठ्ठलदादा मणियार यांच्या गळ्यात पडून रडल्या. यावेळी सुप्रिया सुळे यांनी अजितदादांचा उल्लेख तुमचा एकदम लाडला असा उल्लेख केला. यानंतर त्या मणियार यांच्या गळ्यात पडून रडल्या. यानंतर सुनेत्रा पवार यांना देखील अश्रू थांबवता आले नाहीत. या दोघींनाही विठ्ठल मणियार यांनी आधार दिला आणि त्यांचं सांत्वन केलं.

कोण आहेत विठ्ठल मणियार?

विठ्ठल मणियार हे एक व्यावसायिक आहेत. प्रदीर्घ काळापासून ते शरद पवारांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे स्नेही आहेत. शरद पवार राजकारणात येण्याच्या आधीपासून म्हणजेच महाविद्यालयीन काळापासून त्यांची आणि विठ्ठल मणियार यांची मैत्री आहे. तसंच त्यांचे कौटुंबिक संबंधही अत्यंत जिव्हाळ्याचे आहेत. गेल्या अनेक दशकांपासून विठ्ठल मणियार आणि शरद पवार हे दोघंही खूप चांगले मित्र आहेत. विठ्ठल मणियार यांनी सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या दोघींना त्यांनी आधार दिला. त्यावरुनच हे दिसून आलं की पवार कुटुंबाचे आणि विठ्ठल मणियार अत्यंत जवळचे स्नेही आहेत.

विठ्ठल मणियार यांनी काय सांगितलं होतं शरद पवारांबाबत?

काही वर्षांपूर्वी झालेल्या एका मुलाखतीत विठ्ठल मणियार यांनी शरद पवारांशी मैत्री कशी झालं ते उलगडलं होतं. महाविद्यालयीन काळात आपण शरद पवारांच्या विरोधात विद्यार्थी प्रतिनिधीची निवडणूक लढवली होती आणि ती निवडणूक मी हरलो होतो अशी आठवण सांगितली. मात्र त्या पराभवाने मला एक चांगला मित्र दिला असंही विठ्ठल मणियार म्हणाले होते.

अजित पवार यांच्या पार्थिवावर बारामतीत अंत्यसंस्कार

राज्यामध्ये पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरू आहे. बुधवारी म्हणजेच २८ जानेवारी अजित पवार यांचा बारामती दौरा होता. या बारामती दौऱ्यासाठी अजित पवारांनी बुधवारी सकाळी बारामतीसाठी प्रस्थान केलं होतं. बारामतीमध्ये विमान लाँडिंग होत असतानाच विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने विमान अपघातग्रस्त झालं. विमानामध्ये अजित पवार यांच्यासह सहा जण होते आणि या सहा जणांचा मृत्यू झाला. खराब हवामान आणि तांत्रिक बिघाडामुळे विमान लँडिंगदरम्यान नियंत्रणाबाहेर जाऊन कोसळलं आणि अपघात झाला. आज अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.