Uddhav Thackeray on CM Position : राज्यात निवडणुकीची रंगत चढत असली तरीही मुख्यमंत्री पदाचा चेहरा अद्याप समोर आलेला नाही. महायुती आणि महाविकास आघाडीने मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर केलेला नाही. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात मुख्यमंत्री पदासाठी चढाओढ सुरू आहे. तर, दुसरीकडे महाविकास आघाडीतही मुख्यमंत्री पद कोणाला द्यायचं याबाबत ठराव झालेला नाही. याबाबत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतील मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत वक्तव्य केलं आहे. ते टीव्ही ९ मराठीने घेतलेल्या मुलाखतीत बोलत होते.

जितेंद्र आव्हाडांना मुख्यमंत्री केलं तरी हरकत नाही

मुख्यमंत्री पदावरून महाविकास आघाडीत धुसफूस सुरू असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्यावरूनही महाविकास आघाडीत मतभेद झाले होते. तसंच शरद पवारांच्या मनात मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरेंचा चेहरा नसल्याची खोचक टीकाही देवेंद्र फडणवीसांनी केली होती. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, “शरद पवारांना संख्याबळावर मुख्यमंत्री करायचा असेल तर माझी काहीच हरकत नाही. जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांना मुख्यमंत्री केलं तरी माझं काहीच हरकत नसेल.”

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा करू

“मुख्यमंत्री पदाचा चेहरा काहीवेळा जाहीर करून उपयोग होतो काहीवेळेला होत नाही. मुख्यमंत्री पदाबाबत आम्ही बसून चर्चा करू. पण महाराष्ट्राचे लुटारू मुख्यमंत्री नकोत. माझ्या डोक्यात मुख्यमंत्री पद घुसलंय, असं काही नाही”, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

हेही वाचा >> Uddhav Thackeray on Ram Mandir : “राम मंदिर गळनेका थांबेगा तो…”, उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यामुळे एकच हशा!

मविआत मुख्यमंत्री पदावरून मतभेद नाहीत

“शरद पवारांच्या डोक्यात कोणाला मुख्यमंत्री करायचं हे शिजतंय, पण एवढं निश्चित सांगू शकतो, त्यांच्या डोक्यात जे तीन चार चेहरे असतील, त्यात उद्धवजींचा चेहरा नाही” अशी खोचक टिप्पणी देवेंद्र फडणवीसांनी केली होती. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, “मग काय झालं? ते पुन्हा पुन्हा येणार होते. एक फुल होते त्याचे हाफ का झाले? पण त्यांनी एक मान्य केलं की आमचा मुख्यमंत्री होतोय. शरद पवारांच्या मनात मुख्यमंत्री पदासाठी माझा चेहरा नसूदेत. पण आमच्याही मनात तीन-चारजण असू शकतात. काँग्रेसच्या मनातही असू शकतात. आम्ही सर्वजण चर्चा करून निर्णय घेऊ. त्यामुळे मविआत मुख्यमंत्री पदावरून वाद नाहीत”, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

Story img Loader