Akola Riots : अकोला शहरातील हरिहरपेठ भागात शनिवारी मध्यरात्री दोन गटांमध्ये मोठी दंगल उसळली. या राड्यात अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. तसेच दंगलखोरांनी काही दुचाकी आणि चारचाकीही पेटवल्या. या घटनेत दोन्ही गटांमधील १० जणांसह दोन पोलीस कर्मचारीही जखमी झाले. दरम्यान, या दंगलीवरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. तसंच, या दंगली जाणीवपूर्वक घडवल्या जात असल्याचा आरोप राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “दोन्ही ठिकाणी पूर्पणे शांतता आहे. पोलीस अलर्ट मोडवर होते, त्यामुळे कुठेही अनटोल्ड इंसिडन्स होऊ दिला नाही. जेव्हा लक्षात आलं की अशाप्रकारे काही लोक करण्याचं प्रयत्न करताहेत, सगळीकडची पोलीस कुमक त्याठिकाणी पोहोचली आणि आता पूर्ण परिस्थिती नियंत्रणात आहे. महाराष्ट्रात कोणालाही दंगली घडवू देणार नाही. जे दंगली घडवण्याचा प्रयत्न करताहेत त्यांना अद्दल घडवणार”, असा इशाराही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray
“उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिले काम काय केले? तर…”; चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला
ajit pawar sharad pawar (3)
“…तेव्हा शरद पवार म्हणालेले अजितला राजकारण करू द्या, मी शेती करतो”, उपमुख्यमंत्र्यांनी सांगितला १९८९ मधला प्रसंग
Raj Thackeray Ankita walavalkar
“राज ठाकरेंनी महायुतीच्या सत्तेत सहभागी होण्यापेक्षा…”, कोकण हार्टेड गर्लची खास इच्छा; अमित शाहांबरोबरच्या भेटीवर म्हणाली…
Complaint against Fadnavis
फडणवीस व भाजप उमेदवार राम सातपुतेंविरुद्ध आचार संहिता भंग केल्याची तक्रार, मोची समाजाला प्रलोभन दाखविण्याचा आरोप

महाराष्ट्रात सातत्याने दंगली का उसळताहेत असा प्रश्न फडणवीसांना विचारला असता, देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “हे १०० टक्के जाणूनबुजून होतंय. कोणाची तरी फूस आहे. कोणीतरी महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करतंय. पण ते सफल होणार नाही. अशाप्रकारे जे करातेहत त्यांना आम्ही सोडणार नाहीत”, असा सज्जड दमच फडणवीसांनी दिला आहे. “काही संस्था, काही लोक मागून याला आग लावण्याचा, आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न करताहेत आणि हे सगळं बाहेर आणेन”, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हेही वाचा >> VIDEO : “काही लोकांना मूर्खासारखं बोलायची सवय झालीये, त्यांनी आता…”; जितेंद्र आव्हाडांच्या ‘त्या’ आरोपाला फडणवीसांचं प्रत्युत्तर!

नेमकं प्रकरण काय?

इन्स्टाग्रामवर एका व्यक्तीने वादग्रस्त पोस्ट शेअर केल्यामुळे आधी भांडण आणि मग दंगल उसळली असल्याचं सांगितलं जात आहे. या व्यक्तिविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अकोला शहरात मोठा पोलीसफाटा तैनात करण्यात आला आहे. आता परिस्थिती आटोक्यात असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

या दंगलीविषयी माहिती देताना अकोल्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे म्हणाले, रात्री शहरात जातीय तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असताना शहराच्या काही भागात अचानक दगडफेक शुरू झाली. दंगलखोरांनी वाहनांचं नुकसान सुरू केलं, काही ठिकाणी जाळपोळ झाली. त्याचवेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रित आणण्याचा प्रयत्न केला.