“पराक्रमी हिंदू राजांची अद्वितीय मंदिरे” या दीपा मंडलिक लिखित पुस्तकाचे आज(सोमवार) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते प्रकाशन झाले. या कार्यक्रमास जेष्ठ पुरातत्ववेत्ते, मूर्तिशास्त्र व मंदिरे अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर, राजेंद्र प्रकाशनाच्या निलीमी कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. विश्व संवाद केंद्र, कोकणच्या युट्युब चॅनलवर या कार्यक्रमाचे थेट प्रसारण झाले.

या वेळी “एका मंदिरासाठी एवढं मोठं आंदोलन भारतात का झालं? आणि क्षुद्र बुद्धीने त्या मंदिराला, आंदोलनाला असं लहान ठरवायचं, संकुचित ठरवायचं असे सगळे प्रयत्न झालेले असतानाही सर्वसामान्य भारतीय पक्षाचा विचार न करता, विचारधारेचा विचार न करता, सांप्रदायाचा विचार न करता एकमुखाने त्या मंदिरामागे का उभा राहीला? याचं कारण आहे की, मंदिरं आमच्या समाजाच्या धारणेची साधनं होती.” असं मोहन भागवत यांनी सांगितलं.

replica of Ram temple, Ram campaign,
ठाण्यात ठाकरे गटाकडून रामाचा प्रचार, राजन विचारेंच्या चैत्र नवरात्रोत्सवात राम मंदिराची प्रतिकृती
sanjay ruat and shrikant shinde
श्रीकांत शिंदे फाऊंडेशनमध्ये गैरव्यवहार? संजय राऊतांची थेट मोदींकडे तक्रार; म्हणाले, “बिदागीच्या रकमा…”
kolhapur, cracks on ambabai mahalaxmi idol
अंबाबाई – महालक्ष्मी मूर्तीवर तडे, तातडीने संवर्धन गरजेचे; पुरातत्व खात्याच्या निवृत्त अधिकाऱ्यांच्या पाहणी अहवालात निष्कर्ष
Uddhav Thackrey Kundli Shine In Loksabha Elections Till 2027
“उद्धव ठाकरेंच्या पत्रिकेतच पुरावा, लोकसभेत शिवसेनेला..”, ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी

आपल्या भाषणात सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले, “मंदिराकडे बघण्याची दृष्टी आपली दृष्टी कशी असावी, यासाठी हे पुस्तक वाचणं फार गरजेचं आहे. या मंदिरांनी आपला जो इतिहास पाहिलेला आहे, त्या सगळ्या इतिहासाच्या काळात ही मंदिरं आपल्या समाज जीवानाची केंद्र होती. मंदिर ही संस्था मोक्षाच्या, अध्यात्माच्या पायावर आपल्या इथे घडलेल्या धर्माची केंद्र आहेत. व्यक्तिगत साधाना त्यातून मोक्ष तर आहेच. पण आपलं सगळं जीवनच हे त्या पायावर उभं आहे. हाच फरक आहे भारतामध्ये आणि बाकी सगळीकडे. भौतिकतेच्या पलिकडे बाकी लोक जाऊ शकले नाही आणि भौतिकतेचं चरम गाठल्यावर केव्हातरी एखाद्या ऋुषीला असं सूचलं की बाहेर पाहूनही सत्य सगळं गवसत नाही, तर आत पाहावं आणि अध्यात्माचा जन्म झाला. त्यातून आपल्याला एक सत्य गवसलं की सगळं एकच आहे. मग सगळं एकच आहे दृष्टी घेऊन, विविधतेने नटलेलं त्या विविधतांचा समन्वय साधत असलेलं जीवन कसं घडवावं याचं उदाहरण आपण प्रस्तुत केलं.”

राजांनी मंदिरं बांधली पण त्या मंदिरांवर अधिकार त्यांनी स्वत:चा ठेवला नाही –

तसेच, “कलियुगाच्या काळात सर्वसामान्यांच्या बुद्धीचा स्तर हा जुना राहिला नसताना देखील सगुण भक्तीच्या आधाराने समजाची बांधणी राष्ट्राची बांधणी कशी होईल हे आपण पाहीलं. त्याची केंद्र मंदिरं. मंदिरांमध्ये पाठशाळा चालत असे, मंदिरामध्ये आसपासच्या परिसराचं अर्थशास्त्र घडत असे. मंदिरामध्ये त्यावेळचा जो मुख्य आपला उद्योग शेती विषयक अनेक गोष्टी घडत असतं. मंदिरांमधून निरनिराळ्या देशांच्या व्यापारी संबंधांची जपवणूक त्या व्यापारातून आपल्या इथून तिकडे पाठवायचं ज्ञान, तिकडून इकडे आणायचं ज्ञान हे सगळं होत असे. मंदिरामध्ये समाजाचे संस्कार घडत असे. मंदिराच्या आधारे कितीतरी उभा राहतं आणि म्हणून राजे मंदिरं उभी करायची. पराक्रमी राजे भव्य मंदिरं उभी करायचे. गंमत पाहा, राजांनी मंदिरं बांधली आपल्या पराक्रमाच्या एका अर्थाने फलऋुतीचं प्रतीक म्हणून मंदिरं बांधली, पण त्या मंदिरांवर अधिकार त्यांनी स्वत:चा ठेवला नाही. ती समाजाची मंदिरं होती.” असंही मोहन भागवत यांनी बोलून दाखवलं.

क्षुद्र बुद्धीने त्या मंदिराला, आंदोलनाला लहान, संकुचित ठरवायचं असे सगळे प्रयत्न झालेले असतानाही –

याचबरोबर, “आपला भव्यदिव्य असा इतिहास सांगणारं मंदिर आहे. जो इतिहास जाणीवपूर्वक आपल्यापासून घडवला गेला. एका मंदिरासाठी एवढं मोठं आंदोलन भारतात का झालं? आणि क्षुद्र बुद्धीने त्या मंदिराला, आंदोलनाला असं लहान ठरवायचं, संकुचित ठरवायचं असे सगळे प्रयत्न झालेले असतानाही सर्वसामान्य भारतीय पक्षाचा विचार न करता, विचारधारेचा विचार न करता, सांप्रदायाचा विचार न करता एकमुखाने त्या मंदिरामागे का उभा राहीला? याचं कारण आहे की, मंदिरं आमच्या समाजाच्या धारणेची साधनं होती. त्यामुळे त्या त्या काळात समजाने जे जे काही घडवलं. त्याचं बळ त्यासाठी लागणारी रचना, प्रेरणा, ज्ञान हे सगळं काही त्यांना मंदिरामधून प्राप्त होत होतं ही स्थिती होती. त्यामुळे एक-एक मंदिर हे त्या दृष्टीने पाहायला पाहिजे, त्या दृष्टीने चाललं पाहिजे. मंदिराची परीक्षा करायला आतमध्ये जाणाऱ्याला दर्शन नाही घडत. एक श्रद्धा असावी लागते, श्रद्धावान मंडळी मंदिरं चालवतात. श्रद्धावान मंडळीच्या श्रद्धेमुळे मंदिराचं मंदिरपण असतं. अशी ही मंदिरं ठिकठिकाणी आहेत. ती पाहिली पाहिजेत या भावनेने आणि ती पुन्हा उभी केली पाहिजेत याच भावानेने, यातलं अध्यात्मक सुदैवाने अजुनही टिकून आहे म्हणजे पाया शाबूत आहे. पण बाकीच्या गोष्टी गेल्या आणि सगळ्याच्या सगळ्या तशाच लागू होतील असं नाही.” असं देखील सरसंघचालक यांनी सांगितलं.

तर, “हे निश्चित आहे, की आजही काही प्रमाणात मंदिरं चांगली चालणं ही आसपासच्या परिसरात लोकांच्या योगक्षेमाची व्यवस्था असते. अशी जी मोठी मंदिरं असतात तिथं जाऊन तुम्ही आसपासचा समाज पाहा म्हणजे तुम्हाला कळेल. अशी जी मंदिरं असतात ती चालण्यामुळे आजुबाजूच्या क्षेत्रात संस्कार असतो, श्रद्धा जपल्या जाते.” असं देखील त्यांनी म्हटलं.

पण तरीही शिवाजी महाराजांचा इतिहास किल्ले फिरणाऱ्या मंडळींनी आम्हाला सांगितला –

तसेच, “जिवंत भावाचं नातं घेऊन या मंदिरांकडे पाहीलं पाहिजे म्हणजे आपल्याला गौरवमय इतिहास कळतो. तो आपल्याला कळू नये अशी व्यवस्था, आपल्या ही पराक्रमाची प्रेरणा मिळू नये, यासाठी आवश्यक असलेली रचना आपली बनू नये, यासाठी आवश्यक असेलला भाव आपला विकसीत होवू नये या दृष्टीने आपल्या इतिहासातून ती लुप्त करण्यात आली. आणि दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतर ती चालू झाली पाहिजे अशा मंडळींचं वर्चस्व नव्हतं. ती नको पुन्हा व्हायला अशाच मंडळींचं वर्चस्व त्या क्षेत्रात होतं. पण तरीही शिवाजी महाराजांचा इतिहास किल्ले फिरणाऱ्या मंडळींनी आम्हाला सांगितला. पुस्तकात नव्हता आम्हाला कळला. हे सगळे अवशेष, किल्ले, मंदिरं हे आम्हाला आमची कथा सांगतात.” असंही सरसंघचालक मोहन भागवत यांनी बोलून दाखवलं.