वन्य प्राण्यांची संख्या ‘जैसे थे’ असल्याचा प्राणी गणनेतून निष्कर्ष

अकोले : कळसुबाई हरिशचंद्रगड अभयारण्य क्षेत्रात बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी करण्यात आलेल्या प्राणी गणनेत ८ बिबटय़ांसह आठशेपेक्षा अधिक वन्य प्राण्यांचे अस्तित्व आढळून आले. दोन वर्षे करोनामुळे अभयारण्यात फारसा मानवी हस्तक्षेप नसतानाही वन्य प्राण्यांच्या संख्येत वाढ झालेली नाही. अकोले तालुक्याच्या २५ गावांचा अभयारण्य क्षेत्रात समावेश होतो. दर वर्षी बुद्ध पौर्णिमेला अभयारण्यातील वन्य प्राण्यांची गणना केली जाते. घाटघर, साम्रद, उडणावणे, पांजरे,  रतनवाडी, कोळतेमभे, अंबित, पाचनई, कुमशेत, लव्हाळी, शिरपुंजे, कोथळे, सातेवाडी, फोपसंडी आदी १७ गावांत ही प्राणी गणना करण्यात आली. या गावांच्या जंगल शिवारात असणाऱ्या पाणवठय़ाजवळ निरीक्षणासाठी मचाण उभारण्यात आले होते. त्या ठिकाणी कॅमेरेही लावण्यात आले होते. भंडारदरा व राजूर वनपरिक्षेत्रातील ६२ वनकर्मचारी तसेच आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील कॉलेजचे प्राचार्य डॉ. मोहन वामन, त्यांचे महाविद्यालयातील प्राध्यापक तसेच विद्यार्थी असे २५ जण यात सहभागी झाले होते.

46 lakhs in the bungalow and house of the corrupt Tehsildar
नोटांचे ढीग पाहून एसीबी अधिकारीही चक्रावले; लाचखोर तहसीलदाराच्या बंगला व घरात ४६ लाखाचे घबाड, कॅश मोजायला…
Why are total solar eclipses rare Why is April 8 solar eclipse special
विश्लेषण : ८ एप्रिलचे सूर्यग्रहण वैशिष्ट्यपूर्ण का ठरते? खग्रास सूर्यग्रहण दुर्मीळ का असते?
Tungareshwar Protected Forest is in danger
तुंगारेश्वरचे संरक्षित वन धोक्यात, पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात प्रदूषणकारी कारखाने व अतिक्रमण
village maps
गाव नकाशे नसल्याने मच्छीमारांचे अस्तित्व धोक्यात, पंचवीस वर्षांपासून प्रतीक्षा

बिबटय़ाबरोबरच वानर, माकड, तरस, खार, ससा, रानमांजर, मुंगूस, रानडुक्कर, भेकर, कोल्हा, सांबर, शेखरु, खोकड, उदमांजर अशा सोळा प्रकारच्या वन्य प्राण्यांचे दर्शन या वेळी झाले. रतनवाडी येथील एका पाणवठय़ाजवळ मचाणावर असणाऱ्यांना बिबटय़ाच्या गुरगुरण्याचा आवाज आला. मचाणजवळील गवतातून जात असणाऱ्या या बिबटय़ाने पाणवठय़ाजवळून जाताना डरकाळी फोडली.

भंडारदरा परिसरात ६ बिबटय़ांचे अस्तित्व आढळून आले. तर त्या तुलनेत हरिशचंद्रगड परिसरात दोनच बिबटय़ांचे दर्शन झाले. भंडारदरा जलाशयाकाठच्या रतनवाडी व पांजरे येथे प्रत्येकी एक तर घाटघर आणि कोळटेभे येथील पाणवठय़ावर प्रत्येकी दोन बिबटय़ांचे अस्तित्व आढळले. हरिशचंद्रगड परिसरात अंबित व कोथळे येथे प्रत्येकी एक बिबटय़ा आढळला. दोन वर्षांपूर्वी केलेल्या प्राणी गणनेतही आठच बिबटे आढळले होते. या गणनेत साम्रद येथील पाणवठय़ावर सर्वाधिक म्हणजे विविध जातींच्या ९३ प्राण्यांचे अस्तित्व आढळून आले. घाटघरच्या हरणाच्या पाणवठय़ावर ८३ तर कोलटेम्भे येथील पाणवठय़ावर ७० प्राणी आढळले. पेंडशेत च्या पाणवठय़ाकडे मात्र एकही प्राणी फिरकला नाही.

 मिळालेल्या माहितीनुसार या वन्य प्राणी गणनेत आढळलेल्या वन्य प्राण्यांची संख्या पुढील प्रमाणे :-

वानर २०५, खार ३६, ससा ४६, रानमांजर ३०, तरस २१, माकड ७८, मुंगूस २१, रानडुक्कर १३०, भेकर ४८, कोल्हा ८, सांबर ५८, शेखरु ६, उदमांजर ४, बिबटय़ा ८.

अभयारण्य क्षेत्रात रानडुक्कर तसेच वानर व माकडांची संख्या चांगली आहे. हरिशचंद्रगड परिसरात सांबरांची संख्याही चांगली दिसून आली. या परिसरात बिबटय़ाचे फारसे अस्तित्व नसल्यामुळे कदाचित ही संख्या वाढली असावी. अभयारण्य क्षेत्रात ३० पेक्षा अधिक विविध प्रकारचे पक्षी आढळून आले. त्यात बगळे, बुलबुल, लावरी, भारद्वाज, होले, घुबड, टिटवी, पाणकोंबडी, कोतवाल, कुंभरकुकडा, पेचुक, खंडय़ा, सातभाई आदी पक्ष्यांचा समावेश आहे. तीन ससाणेही दिसून आले. चिमणी कावळय़ांची संख्या मात्र जेमतेम आहे. मोरही फारसे दिसून आले नाहीत.