वन्य प्राण्यांची संख्या ‘जैसे थे’ असल्याचा प्राणी गणनेतून निष्कर्ष

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अकोले : कळसुबाई हरिशचंद्रगड अभयारण्य क्षेत्रात बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी करण्यात आलेल्या प्राणी गणनेत ८ बिबटय़ांसह आठशेपेक्षा अधिक वन्य प्राण्यांचे अस्तित्व आढळून आले. दोन वर्षे करोनामुळे अभयारण्यात फारसा मानवी हस्तक्षेप नसतानाही वन्य प्राण्यांच्या संख्येत वाढ झालेली नाही. अकोले तालुक्याच्या २५ गावांचा अभयारण्य क्षेत्रात समावेश होतो. दर वर्षी बुद्ध पौर्णिमेला अभयारण्यातील वन्य प्राण्यांची गणना केली जाते. घाटघर, साम्रद, उडणावणे, पांजरे,  रतनवाडी, कोळतेमभे, अंबित, पाचनई, कुमशेत, लव्हाळी, शिरपुंजे, कोथळे, सातेवाडी, फोपसंडी आदी १७ गावांत ही प्राणी गणना करण्यात आली. या गावांच्या जंगल शिवारात असणाऱ्या पाणवठय़ाजवळ निरीक्षणासाठी मचाण उभारण्यात आले होते. त्या ठिकाणी कॅमेरेही लावण्यात आले होते. भंडारदरा व राजूर वनपरिक्षेत्रातील ६२ वनकर्मचारी तसेच आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील कॉलेजचे प्राचार्य डॉ. मोहन वामन, त्यांचे महाविद्यालयातील प्राध्यापक तसेच विद्यार्थी असे २५ जण यात सहभागी झाले होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wild animals including eight leopards kalsubai harishchandragad sanctuary ysh
First published on: 20-05-2022 at 00:02 IST