राष्ट्रवादीचे नेते अजित पवार मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांना राज्यात जोर आला आहे. अमित शाहांचा दाखला घेऊनही अनेकजण असा दावा करत आहेत. तर, राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनीही असाच दावा केला आहे. या सर्व प्रकारात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी काँग्रेसची भूमिका मांडली आहे. सध्या राज्यातील जनता अनेक समस्यांना तोंड देत आहे, शेतकऱ्यांचे अवकाळी व गारपीटीमुळे नुकसान झाले आहे, महागाई आहे, बारसू प्रकल्प जबरदस्तीने लादला जात आहे. खारघरमध्ये सरकारी कार्यक्रमात हत्याकांड झाले, त्यावर सरकार लपवाछपवी करत आहे. जनतेचे प्रश्न महत्वाचे आहेत, त्यावर आमचे लक्ष आहे. बाकीच्या चर्चांमध्ये आम्हाला रस नाही, असेही नाना पटोले म्हणाले. ते आज भंडाऱ्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

नाना पटोले म्हणाले की, अमित शाह कशाच्या आधारावर बोलत आहेत माहीत नाहीत. परंतु, राज्यात कोणत्याही निवडणुका नसताना अशा चर्चा होणं म्हणजे बालिशपणा आहे. राज्यात मुख्यमंत्रीपदाची स्पर्धा सरु आहे त्यात काँग्रेसला पडायचे नाही. जनतेचे प्रश्न काँग्रेससाठी महत्वाचे आहेत. आम्ही जनतेचे प्रश्न घेऊन लढत आहोत. मुख्यमंत्री कोणाला करायचे हे जनताच ठरवेल.

Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान
12 December Rashi Bhavishya In Marathi
दुसरा गुरुवार, १२ डिसेंबर पंचांग: महालक्ष्मीच्या कृपेने मेषला…
Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit Pawar Narendra Modi
“…तर शिंदेंशिवाय शपथविधी झाला असता”, ठाकरेंच्या शिवसेनेचा दावा; म्हणाले, “सत्तेत आमचेही लोक, आतल्या गोष्टी…”
Mohit Kamboj
“तुला उचलणार”, सत्ता येताच भाजपाच्या मोहित कंबोजांची सोशल मीडियावरून धमकी; ठाकरेंच्या शिवसेना नेत्यानं दिलं आव्हान
Mallikarjun Kharge
भाजपावाले आता ताजमहाल, लाल किल्ला व कुतुब मिनारही पाडणार का? संभलमधील दंगलीनंतर काँग्रेस आक्रमक
Purwa Walse Patil emotional post for father dilip walse patil
Purva Walse Patil: “आजारी व्यक्तीच्या मरणाची कामना…”, वडिलांच्या आरोग्यावर विरोधकांकडून विधान, पूर्वा वळसे पाटील संतापल्या
Sanjay Raut vs Eknath Shinde
“शिंदेंना डॉक्टरची नव्हे मांत्रिकाची गरज”, ‘अमावस्ये’वरून ठाकरेंच्या शिवसेनेचा चिमटा; म्हणाले, “प्रकृती नाजूक असल्याने मंत्र्यांना…”
Readers reaction on Girish kuber article lilliputikaran in loksatta lokrang
पडसाद : असाही इतिहास

यावेळी त्यांनी केंद्र सरकारवरही टीकास्त्र सोडलं. “केंद्रात सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षाने मागील ९ वर्षात जनतेसाठी काहीही केलेले नाही. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी सर्वच आघाड्यांवर सपशेल अपयशी ठरले असून देशाची संपत्ती विकून देश चालवणारा पंतप्रधान देशाने पहिल्यांदाच पाहिला. नरेंद्र मोदी यांचा खरा चेहरा देशातील जनतेला आता कळाला असून नरेंद्र मोदी हे, ना हिंदूंचे आहेत, ना मुस्लीमांचे, ना देशाचे”, असा घणाघाती हल्ला नाना पटोले यांनी केला आहे.

हेही वाचा >> “भाकरी फिरवली पाहिजे याचा अर्थ अजितदादांना दूर केलं पाहिजे”, शरद पवारांच्या विधानावर शिवसेना नेत्याची प्रतिक्रिया

मोदींनी देशासाठी काय केलं?

“जनतेने भाजपाला केंद्रात दोनदा बहुमताने सत्ता दिली पण भाजपाने जनतेला काय दिले, याचे उत्तर देण्याची वेळ आली आहे. काँग्रेसने ६० वर्षात काय केले सांगण्यासाठी भाजपाच्या प्रमाणपत्राची गरज नाही. स्वातंत्र्यानंतर देशात काहीही नव्हते, सुईपासून रॉकेटपर्यंत काँग्रेस सरकारच्या नेतृत्वाखाली देशाने विकासाचे शिखर गाठले, भारताला जगात महासत्ता बनवले. काँग्रेस सरकारांनी विकासच केला नसता तर नरेंद्र मोदी आज जी देशाची संपत्ती विकत आहेत ती कुठून आली असती. काँग्रेसविरोधात सातत्याने थोतांड मांडून जनतेची दिशाभूल करण्याचे काम नरेंद्र मोदी करत आहेत ते त्यांनी आता थांबवावे. नरेंद्र मोदींना सत्तेत येऊन ९ वर्ष झाली, तुम्ही देशासाठी काय केले? हे सांगण्याची वेळ आहे, ते तुम्ही सांगा.

“काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्याआधी नरेंद्र मोदी यांनी आपल्या पक्षांच्या राज्य सरकारांचा कारभार पहावा. कर्नाटकात मुख्यंमत्रीपदासाठी २५०० कोटी रुपयांचा लिलाव केला…मंत्रीपदासाठी कोट्यवधी रुपयांचा लिलाव झाला होता हे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टार यांनीच सांगितले आहे. कर्नाटकात ४० टक्के कमिशनचे सरकार आहे, त्याचे उत्तर आधी नरेंद्र मोदींनी द्यावे. काँग्रेसवर आरोप करून तुम्ही तुमची सुटका करून घेऊ शकत नाही. तुमच्या पक्षावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचे उत्तर जनतेला द्या. काँग्रेसवर बिनबुडाचे आरोप करुन जनतेची दिशाभूल करु असे जर तुम्हाला वाटत असेल तर जनतेला तुमचा खरा चेहरा समजलेला आहे हे लक्षात ठेवा”, असंही नाना पटोले म्हणाले.

हेही वाचा >> “मुख्यमंत्री कोण होणार? हे केंद्रातील नेते ठरवतील”, भागवत कराड यांचं थेट विधान

“काँग्रेसकडे प्लॅन बी, प्लॅन सी, सगळे प्लॅन तयार आहेत, आम्ही ते प्लॅन योग्यवेळी सांगू. सध्या राज्यातील जनता अनेक समस्यांना तोंड देत आहे, शेतकऱ्यांचे अवकाळी व गारपीटीमुळे नुकसान झाले आहे, महागाई आहे, बारसू प्रकल्प जबरदस्तीने लादला जात आहे. खारघरमध्ये सरकारी कार्यक्रमात हत्याकांड झाले, त्यावर सरकार लपवाछपवी करत आहे. जनतेचे प्रश्न महत्वाचे आहेत, त्यावर आमचे लक्ष आहे. बाकीच्या चर्चांमध्ये आम्हाला रस नाही”, असेही नाना पटोले म्हणाले.

Story img Loader