scorecardresearch

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपात जाणार? राधाकृष्ण विखे-पाटलांची खुली ऑफर, चर्चांना उधाण

भाजपा नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी अशोक चव्हाणांना खुली ऑफर दिली.

ashok chavhan and radhakrushna vikhe patil
फोटो- लोकसत्ता ग्राफिक्स टीम

मागील काही महिन्यांपासून देशातील विविध राजकीय पक्षांना गळती लागली आहे. देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष असलेल्या काँग्रेसमधून अनेक नेत्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. तसेच काँग्रेस पक्षातील अंतर्गत वादही अनेकदा चव्हाट्यावर आला आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण भाजपात जाणार का? याबाबत चर्चांना उधाण आलं आहे.

हेही वाचा- पिक्चर अभी बाकी है? शरद पवारांवरील गौप्यस्फोटानंतर फडणवीसांचं आणखी एक मोठं विधान, म्हणाले…

भाजपा नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी भाजपात प्रवेश करण्याची खुली ऑफर दिल्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. अशोक चव्हाण हे एक सक्षम नेते आहेत. काँग्रेस पक्षाचं भविष्य अंधारमय आहे, त्यामुळे अशोकराव चव्हाण यांनी भाजपात प्रवेश करण्याचा विचार करावा, अशी खुली ऑफर विखे-पाटील यांच्याकडून देण्यात आली आहे. या ऑफरनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

हेही वाचा- “तेव्हा थेट ब्रेकिंग न्यूज करा”, आणखी एका राजकीय भूकंपाबाबत बच्चू कडूंचं सूचक विधान!

अशोक चव्हाणांना ऑफर देताना राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले, “अशोक चव्हाण सध्या ज्या पक्षात आहेत. त्या काँग्रेस पक्षाचं भविष्य काय आहे? नाशिक पदवीधर मतदारसंघात व्यक्तिगत अजेंड्यावर निवडणूक जिंकली. तिथे पक्षाचा कुठेही विचार झाला नाही. पक्षाचा विचार करण्यासाठी काँग्रेसमध्ये कुणालाही वेळ नाही. मला वाटतं की अशोक चव्हाण हे एक सक्षम नेते आहेत. त्यांनी मुख्यमंत्री पदावर काम केलं आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व संपूर्ण जगाने स्वीकारलं आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली काम करायला सर्वांनाच आवडेल. अशोकराव चव्हाणांनीही याबाबत विचार केला पाहिजे.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-02-2023 at 16:23 IST
ताज्या बातम्या