शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण होणार असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. मात्र आता भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे घोषणा केली आहे. आज संध्याकाळी शिंदे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. फडणवीसांच्या या घोषणेनंतर एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली. बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व घेऊन पुढे निघालो आहोत, असे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> Eknath Shinde New Maharashtra CM : देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा, एकनाथ शिंदे होणार राज्याचे नवे मुख्यमंत्री!

“बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व, आमदारांच्या मतदारसंघातील विकासकामे आणि राज्याचा विकास हा अजेंडा घेऊन आम्ही पुढे निघालो आहोत. शिवसेना पक्षाचे दोन तृतियांशपेक्षा जास्त आमदार तसेच काही अपक्ष आमदार असे ५० पेक्षा जास्त लोक आम्ही काही दिवसांपासून सोबत आहोत. गेल्या काही काळामध्ये आम्ही मुख्यमंत्र्यांना आमच्या मतदारसंघातील समस्या, विकास प्रकल्प, अडचणी यांची माहिती वारंवार दिली. मी देखील अनेकवेळा त्यांच्याशी चर्चा केली. पण आमदारांमध्ये नाराजी होती,” असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

हेही वाचा >>> “मी सरकारच्या बाहेर राहून…”; एकनाथ शिंदे नवे मुख्यमंत्री असल्याचं जाहीर करताना देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

तसेच, “मी नगरविकास मंत्री होतो. मात्र राज्याच्या हिताच्या, भविष्याच्या दृष्टीने जे निर्णय घ्यायचे होते ते घेता येत नव्हते. काही निर्णय झाले आहेत, त्याचे आम्ही स्वागतच केले आहे. पन्नास आमदार जेव्हा वेगळी भूमिका घेतात, तेव्हा आत्मपरीक्षण करण्याची गरज होती,” असेदेखील एकनाथ शिंदे म्हणाले.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा >>> उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले “ज्या दिवशी नशिबालाच…”

तसेच, “मी नगरविकास मंत्री होतो, माझ्या अडचणी होत्या त्या बाजूला राहुद्या. बाकीच्या आमदारांनी त्यांच्या समस्या मला सांगितले. त्यांनी मला सांगितले की आपण तीन चारवेळा सांगण्याचा प्रयत्न केला पण यश मिळाले नाही. त्यामुळे हा राज्याच्या हितासाठी हा निर्णय घ्यावा लागला, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, आज संध्याकाळी ७.३० वाजता एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. त्यानंतर मंत्रिमंडळाचे वाटप होईल. भाजपाे नेते देवेंद्र फडणवीस या सरकारचा भाग नसतील. मात्र त्यांचा बाहेरुन या सरकारला पाठिंबा असेल. तशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will follow hindutva ideology of balasaheb thackeray said next cm eknath shinde prd
First published on: 30-06-2022 at 18:03 IST