गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील मुख्य आणि नागरिकांना जिव्हाळ्याची असलेल्या पांगोली नदीच्या पुनरुज्जीवनसाठी आपले मंत्रालय सदैव तत्पर असून या नदीच्या पुनरुज्जीवनासाठी आपण पुढाकार घेऊ, असे आश्वासन केंद्रीय जलसंसाधन व नदी विकास मंत्री नितीन गडकरी यांनी दिले. ते गोंदियामध्ये बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> “पंतप्रधान मोदी स्वत:ला गांधीवादी म्हणत असले, तरी ते मूळ सावरकर…”; शरद पोंक्षेंचं मोठं विधान

रविवार २९ मे रोजी गोंदिया येथील जिल्हा क्रीडा संकुल परिसरात आयोजित महामार्ग, रस्ते भूमीपूजन कार्यक्रमात नितिन गडकरी यांनी आपल्या भाषणात गोंदिया जिल्ह्यातील नागरिक, शेतकरी व सामाजिक संस्थांची मागणी लक्षात घेता पांगोली नदीचे पुनरूज्जीवन करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली. यावेळी बोलताना “या नदीच्या उगमस्थानापासून ते शेवटच्या टोकापर्यंत नदीपात्राचे विस्तारीकरण आणि साचलेला गाळ काढून तो राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकाम वापरासाठी योग्य असल्यास त्याठिकाणी वापरण्याबाबत आपण आजच संबधितांना निर्देश देत आहोत. फक्त जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला तसे पत्र उपलब्ध करुन द्यावे,” असे गडकरी म्हणाले.

हेही वाचा >>> “शरद पवार आणि फडणवीस यांच्यात काय संबंध आहेत हे…”; शाहू महाराजांचा उल्लेख करत नाना पटोलेंचं विधान

तसेच खासदार सुनिल मेंढे यांनी आपल्या भाषणातून पांगोली नदी पुनरुज्जीवनाचा विषय मंत्री गडकरी यांच्या निदर्शनास समाजोन्नती बहु. ग्रामीण व शहरी संस्था व पांगोली नदी वाचवा अभियान कृती समितीच्या माध्यमातून निदर्शनास आणून दिला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will help by all possible way to revive pangoli river in yavatmal district said nitin gadkari prd
First published on: 29-05-2022 at 18:28 IST