करोनासोबत जगण्यासाठी आता नवी नियमावली बनवायला हवी, असं मत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केलं आहे. त्यासाठी केंद्र आणि राज्याचं टास्क फोर्स एकत्र काम करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. अनेक देशात मास्क काढले जात आहेत, त्यामुळे आपल्याकडे त्या अनुषंगाने काय निर्णय होणार याबद्दल राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे. काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली. त्याबद्दल राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे.

यासंदर्भात टीव्ही ९ सोबत बोलताना राजेश टोपे म्हणाले, “एक नक्की आहे की मुंबई, ठाणे, पालघर या भागात रुग्णवाढीचा ट्रेंड होता. तो आता कमी झाला आहे, ही दिलासादायक बाब म्हणता येईल. परंतु, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगबाद इथली रुग्णसंख्या मात्र वाढत आहे. पण पूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर एक लक्षात येईल की जिथे रुग्णसंख्या वाढत आहे तिथे ५ टक्क्यांच्या वर बेड ऑक्युपन्सी नाही (रुग्णांना दवाखान्यात दाखल करण्याची गरज नाही). आयसीयू आणि व्हेंटिलेटरवरचे रुग्ण १ टक्क्यांहूनही कमी आहेत”.

bjp to defeat mamta banerjee in loksabha
ममतादीदींच्या तृणमूलचा पराभव करण्यासाठी भाजपाला ‘या’ जागा जिंकण्याची गरज; पश्चिम बंगालमध्ये पक्षाची स्थिती काय?
Why MHADA will not build houses in high income group
म्हाडाकडून यापुढे उच्च उत्पन्न गटातील घरांची निर्मिती नाही?
economic confidence china japan company
जर्मन कंपन्या चीनमधून पुन्हा जपानमध्ये का जात आहेत?
Government decision not to increase read reckoner for elections
रेडीरेकनर वाढीला निवडणुकीची वेसण; घरांच्या किमती घटणार? रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीवर काय परिणाम?

करोना परिस्थितीसंदर्भातल्या लाईव्ह अपडेट्ससाठी येथे क्लिक करा.

राजेश टोपे यांनी पुढे सांगितलं, “इंग्लंड, डेन्मार्क, हॉलंड, युरोपीय राष्ट्रांमध्ये, अमेरिकेतही रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. मात्र त्या ठिकाणी विशेषतः युकेमध्ये मास्कमुक्ती करण्यात आलेली आहे, निर्बंध कमी केले आहेत. जर ही चर्चा घडवून आणली आणि सांगितलं की आम्हालाही मार्गदर्शन करा तर मुख्यमंत्री आणि कॅबिनेटने असे स्पष्ट निर्देश दिले आहेत राज्य टास्क फोर्स, केंद्रीय टास्क फोर्स, ICMR सर्वांना कळवलं पाहिजे की तो निर्णय जर विज्ञानाधिष्ठित असेल तर तो का घेतला कसा घेतला? आणि मग त्याबद्दल महाराष्ट्रालाही मार्गदर्शन व्हावं अशी अपेक्षा कॅबिनेटने व्यक्त केली. आम्ही त्या पद्धतीच्या सूचना कालच्या बैठकीनंतर ICMR, राज्य टास्क फोर्स आणि केंद्रीय टास्क फोर्सला पाठवल्या आहेत”.

आपल्याला करोनासोबत जगणं शिकायला हवं – राजेश टोपे

टोपे म्हणाले, “दररोज रुग्ण बरं होण्याचं प्रमाण हे रुग्ण बाधित आढळण्याच्या प्रमाणापेक्षा जास्त आहे. त्यामुळे आता आपल्याला कोविडबरोबर जगावं लागेल, अशा संकल्पनेतून आपल्याला पुढची वाटचाल करावी लागेल. हे आपल्याला पाश्चिमात्य देशांमध्ये रुग्णसंख्या वाढत असतानाही निर्बंध कमी केल्यातून दिसत आहे. केंद्र शासन, ICMR, टास्क फोर्सने आम्हाला मार्गदर्शन केलं तर आम्हालाही कोविडबरोबर कसं जगता येईल याबद्दल लोकांना मार्गदर्शन आणि प्रबोधन करता येईल”.