“ आता मुख्यमंत्री आणि त्यांच्या पक्षाचे प्रमुख मलिकांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करणार का? ” ; भाजपाचा सवाल!

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या गंभीर आरोपाच्या पार्श्वभूमीवर साधला आहे निशाणा

(प्रातिनिधिक छायाचित्र)

मुंबई क्रुझ ड्रग्ज प्रकरण व आर्यन खानच्या अटकेनंतर राज्यात सुरू झालेला राजकीय धुळवड अद्यापही सुरूच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी आणि विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यासह विरोधी पक्ष भाजपावर देखील टीका सुरू केलेली आहे. यावर आता भाजपाकडून देखील आक्रमक भूमिका घेत प्रत्युत्तर दिले जात आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांचे थेट अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप केला आहे. विशेष म्हणजे यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी कागदोपत्री पुरावे देखील सादर केले असून ते संबंधित तपास यंत्रणांकडे देखील देणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तर, फडणवीसांच्या या खळबळजनक आरोपाच्या पार्श्वभूमीवर भाजपाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला गेला आहे.

“अंडरवर्ल्डशी संबंधित जागांच्या व्यवहारात नवाब मलिकांचा सहभाग”; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक आरोप, पत्रकार परिषदेत दिले पुरावे!

“विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उघड केले मंत्री नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डसोबत असलेले संबंध. मलिक यांनी देशाच्या गुन्हेगारांसोबत केलेले व्यवहार पुराव्यानिशी समोर आले आहेत. आता मुख्यमंत्री व त्यांच्या पक्षाचे प्रमुख मलिकांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करणार का?” असा सवाल भाजपाकडून करण्यात आला आहे.

तर, नवाब मलिक यांचा सहभाग असलेल्या किमान ५ व्यवहारांमध्ये अंडरवर्ल्ड कनेक्शन असल्याचा दावा फडणवीस यांनी केला आहे. २००५ पासून दोन वर्षांपूर्वीपर्यंत म्हणजेच नवाब मलिक राज्यात अल्पसंख्याक मंत्री होईपर्यंत झालेल्या व्यवहारांचा यामध्ये समावेश असल्याचं फडणवीस म्हणाले. आज दुपारी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Will malik be expelled from the cabinet now bjps question msr

Next Story
‘कोरा कागद निळी शाई, आम्ही कोणाला भीत नाही’!
ताज्या बातम्या