scorecardresearch

ठाकरे सरकार पडणार का? मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणतात…

भाजपा नेत्यांच्या वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर बोलताना पत्रकारपरिषदेत केलं आहे विधान, जाणून घ्या काय म्हणाले.

(संग्रहित प्रातिनिधिक छायाचित्र)

राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे लवकरच पडणार आहे, राज्यात लवकरच भाजपाचं सरकार येणार आहे. अशा प्रकारची विधानं भाजपा नेत्यांकडून केली जात आहेत. केंद्रीयमंत्री नारायण राणे, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी या संदर्भात आतापर्यंत विधानं केल्याचं समोर आलेलं आहे. तर, भाजपा नेत्यांकडून केल्या जाणाऱ्या सरकार पडण्याबाबतच्या वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये पत्रकारपरिषदेत आपलं मत व्यक्त केलं आहे.

“ज्यांनी पेपर फोडला ते अजून फुटले नाहीत म्हणून… ” ; राज ठाकरेंचं विधान!

महाराष्ट्रात तीन पक्षांचं सरकार आहे, भाजपा यात मग्न आहे की आमचं सरकार येईल. यामध्ये महाराष्ट्राला तुमची गरज आहे असं तुम्हाला वाटत नाही का? कारण एक सक्षम व्यक्ती या तिन्ही सत्ताधाऱ्यांना कोणी दिसत नाही, अशी सध्याची परिस्थिती आहे. याबाबत तुम्ही काय विचार करत आहात का? आणि पुन्हा एकदा सक्षम पर्याय उभा करण्यासाठी तुम्ही काही करत आहात का? असा प्रश्न माध्यम प्रतिनिधीकडून विचारण्यात आल्यानंतर राज ठाकरे म्हणाले की, “मी बाहेर पडलोय ना… आणि आताचे एकूण हे तिघाचे सरकार पाहता, हे काही आता पडेल असं सरकार वाटत नाही मला”

उद्धव ठाकरे, सचिन वाझे, मुकेश अंबानी… आणि बाँब ठेवलेली गाडी; राज ठाकरेंचं भाकीत

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी दिल्लीत माध्यमांशी बोलताना राज्यात लवकरच भाजपाचं सरकार येईल असं विधान केलं होतं. त्यापाठोपाठ विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी देखील तशाच प्रकराचं विधान केलं होतं.

“सरकार पाडून नवं सरकार स्थापन करायचं असेल तर काही गोष्टी गुपित…”, नारायण राणेंची नवी राजकीय भविष्यवाणी

महाराष्ट्र सरकार भेदभाद करत असल्याच्या आरोपावर बोलताना नारायण राणे म्हणाले होते की, “महाराष्ट्रात भाजपाचं सरकार नाही त्यामुळे तिथं तसं होतंय. लवकरात लवकर महाराष्ट्रात भाजपाचं सरकार येईल आणि तुम्हाला अपेक्षित बदल दिसेल. माझ्या आतमध्ये जी गोष्ट आहे ती आत्ताच बाहेर सांगायची नाहीये. एखादं सरकार पाडायचं असेल आणि नवं सरकार स्थापन करायचं असेल तर काही गोष्टी गुपित ठेवाव्या लागतात. अशा ठिकाणी काही बोललो तर आणखी एखादा महिना पुढे ढकलेल.”

“ सरकार तर भाजपाचं येणारचं, फक्त आता आम्ही … ” ; प्रवीण दरेकरांचं पत्रकारपरिषदेत विधान!

तर, “सरकार तर भाजपाचं येणारचं, फक्त आता आम्ही भविष्यवाणी आज, उद्या, परवा करत नाही. पण महाराष्ट्राच्या भविष्यासाठी भाजपाच्या सरकार शिवाय पर्याय नाही. हे तीन तिघाडं सरकार महाराष्ट्राचं हीत करू शकत नाही. कारण, सरकार चालवत असताना तुम्हाला एक वाक्यता लागते, समन्वय लागतो, निर्णय क्षमता लागते, वेळ द्यावा लागतो. मुख्यमंत्री महाराष्ट्रासाठी वेळ देताना दिसत नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रामधील सगळे प्रकल्प ठप्प आहेत. आरक्षणाचे विषय प्रलंबित आहेत. आरक्षणाची गाजरं दाखवतात, मराठा समजाला आज आरक्षण मिळालेलं नाही. त्यामुळे या सगळ्यावर जर महाराष्ट्राचं पुन्हा सुरळीत कामकाज सुरू व्हायला पाहिजे, तर या राज्याला सद्यस्थिती भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकारचीच आवश्यकता आहे.” असं नंदुरबार येथे पत्रकारपरिषदेत बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Will thackeray government fall mns chief raj thackeray says msr

ताज्या बातम्या