हर्षद कशाळकर

अलिबाग : कोकण शिक्षक मतदार संघासाठी येत्या ३० जानेवारीला निवडणूक होत आहे. भाजपप्रणीत शिक्षक परिषदेचा वर्चस्व असलेल्या या मतदार संघाला गेल्या निवडणुकीत शेकापने सुरुंग लावला होता. त्यामुळे खालसा झालेले संस्थान पुन्हा काबीज करण्याचे मोठे आव्हान भाजपसमोर असणार आहे.

Jalna Lok Sabha, Raosaheb Danve, Kalyan Kale,
जालन्यात पुन्हा दानवे विरुद्ध काळे सामना रंगणार
Former Congress president Rahul Gandhi filed his candidature from Wayanad in Kerala
वायनाडमध्ये शक्तिप्रदर्शनासह राहुल गांधी यांचा अर्ज; अमेठीमधून उमेदवारीबाबत मौन
buldhana lok sabha
ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर बुलढाण्याचे आघाडीचे उमेदवार; प्रथमच ‘मोठ्या रणांगणात’!
Challenge of two women candidates before Asaduddin Owaisi
ओवैसींसमोर यंदा दोन महिला उमेदवारांचे आव्हान; कसा राखणार हैदराबाद मतदारसंघ?

ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग असे पाच जिल्हे मिळून या मतदारसंघाची रचना आहे. विस्तृत प्रदेश असल्याने मतदारांशी संवाद साधणे, संपर्कात राहणे मोठे जिकिरीचे काम ठरत आहे. त्यामुळे शिक्षक संघटनांच्या पाठबळावर राजकीय पक्षांना आपली वाटचाल करावी लागत आहे. या मतदार संघासाठी एकूण आठ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यात भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे, धनाजी नानासाहेब पाटील जनता दल युनायटेड, उस्मान इब्राहिम रोहेकर अपक्ष, तुषार वसंतराव भालेराव अपक्ष, रमेश नामदेव देवरुखकर अपक्ष, बाळाराम दत्तात्रय पाटील अपक्ष आणि संतोष मोतीराम डामसे अपक्ष असे एकूण आठ उमेदवार निवडणूक रिंगणात असणार आहेत.

मतदार संघात एकूण ३७ हजार शिक्षक मतदार आहेत. यात ठाणे जिल्ह्यातील सर्वाधिक १४ हजार ९९५, रायगडमधील १० हजार ०८७, पालघरमधील ६ हजार ७१८, रत्नागिरीमधील ४ हजार ०६९ तर सिंधुदूर्ग जिल्ह्यातील २ हजार १६४ मतदारांचा समावेश आहे. मतदारांची संख्या जास्त असल्याने ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील मतदारांचा कौल महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे शेकापने रायगडमधील तर भाजपने ठाणे जिल्ह्यातील उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविले आहेत.

Maharashtra MLC Election Results Live: “..म्हणून मी जिंकणार”,शुभांगी पाटील यांनी सांगितलं मतांचं गणित; सत्यजीत तांबेंच्या पराभवाचा दावा!

बाळाराम पाटील यांच्यासाठी महाविकास आघाडीची साथ, तसेच रयत शिक्षण संस्था, कोकण एज्युकेशन सोसायटी, पीएनपी एज्युकेशन सोसायटी, सुधागड एज्युकेशन सोसायटीची साथ महत्त्वाची ठरणार आहे. तर भाजपच्या ज्ञानेश्वर म्हात्रे यांना भाजप आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेचे पाठबळ महत्त्वपूर्ण ठरणार आहे. शिक्षक परिषदेच्या वेणूनाथ कडू यांनी निवडणुकीतून घेतलेली माघार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या पथ्यावर पडू शकते. त्याचबरोबर शिक्षक सेनेच्या माध्यमातून गेल्या सहा वर्षांत मतदारसंघ बांधणी म्हात्रे यांना उपयुक्त ठरू शकते. त्यामुळे दोन तुल्यबळ प्रमुख उमेदवारांत मतदार संघासाठी लढत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

नाशिकच्या निकालाआधी सत्यजित तांबे यांनी गमावला जवळचा सहकारी; मानस पगार यांचे अपघाती निधन

काही अपवाद वगळले तर या मतदान संघावर कायम भाजपप्रणीत शिक्षक परिषदेचा वरचष्मा राहिला आहे. सुरुवातीला प्रभाकर सावंत, त्यानंतर वसंत बापट, सुरेश भालेराव, रामनाथ मोते शिक्षक परिषदेकडून या विधान सभेवर निवडून गेले आहेत. वसंत बापट आणि रामनाथ मोते यांनी प्रत्येकी दोन वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. मात्र गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने शेकापने भाजपचे संस्थान खालसा केले होते. पनवेल येथील रयत शिक्षण संस्थेवर काम करणारे बाळाराम पाटील पहिल्यांदा या मतदार संघातून निवडून गेले होते. त्यामुळे शेकापने खालसा केलेला हा मतदार संघ पुन्हा मिळवण्याचे मोठे आव्हान भाजपसमोर असणार आहे.