Amruta Fadnavis : राज्यातील २९ महानगरपालिकांची रणधुमाळी संपलेली आहे. यामध्ये भाजपाला मोठं यळ मिळालं आहे. अत्यंत चुरशीची मानली जाणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत देखील भाजपने यश मिळवले आहे. मात्र, शिवसेनेच्या साथीशिवाय भाजपचा महापौर बसणे शक्य नाही. त्यामुळं मुंबई महापालिकेचा महापौर कोण होणार याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. अशातच मुंबईच्या महापैर पदाबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. मुंबईचा महापौर कोण होईल यावर भाष्य केलं आहे. तसंच संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे.
देवेंद्र माझ्याशिवाय आणि दिविजाशिवाय पिकनिकला कसे जातील? – अमृता फडणवीस
संजय राऊत म्हणाले होते की मुख्यमंत्री दावोसला पिकनिकला गेले आहेत. त्याबाबत विचारलं असता अमृता फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. संजय राऊत काय बोलतात त्यांची भाषा मला कळत नाही. जो व्यक्ती पिकनिकला जातो तो सकाळी ६ ते रात्री ११ कॉन्फरन्स किंवा मिटिंग करत नाही ज्यामुळे राज्यात आणि देशात गुंतवणूक येते. त्यामुळे संजय राऊत यांनी असं म्हणणं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पिकनिकला गेले आहेत ते अतिशय चुकीचं आणि त्यांच्या सगळ्या दाव्यांप्रमाणे निरर्थक आहे. तसंच देवेंद्र फडणवीस हे काही पिकनिकला गेलेले नाहीत. ते पिकनिकला माझ्याशिवाय कसे जातील असं म्हणत त्यांनी संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसंच महापौर कोण होणार? यावरही अमृता फडणवीस यांनी भाष्य केलं आहे.
मुंबईचा महापौर कोण होणार? अमृता फडणवीस यांनी काय उत्तर दिलं?
मुंबईचा महापौर भाजपाचा होणार की एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा होणार अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्याचबरोबर महापौर मराठी होणार की अमराठी यावरुन देखील चर्चा सुरु आहे. अशातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. “मुंबईचा महापौर हा महायुतीचा मराठी माणूस होणार” असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.
मुंबई महापालिकेतला निकाल काय? कुठल्या पक्षाला किती जागा?
भाजपा – ८९
शिवसेना ठाकरे गट – ६५
शिवसेना – २९
काँग्रेस – २४
मनसे – ६
एमआयएम- ८
एनसीपी – ३
एसपी – २
एनसीपी शप – १
एकूण- २२७
२२ जानेवारीला महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत
राज्यातील २९ महानगरपालिकामधील महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत २२ जानेवारी रोजी काढली जाणार आहे. २२ जानेवारीला सकाळी ११ वाजता सर्व महापालिकांसाठी महापौरपदाची आरक्षण सोडत काढली जाणार आहे. त्यामुळे कोणत्या प्रवर्गाचा महापौर कोणत्या नगरपालिकेमध्ये बसणार हे २२ जानेवारीला निश्चित होईल. नगरविकास विभागाकडून महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत मंत्रालयात काढली जाईल.
