अलिबाग- रायगड लोकसभा मतदारसंघासाठी २०१४ साली अटीतटीची लढत पहायला मिळाली होती. शेवटच्या फेरीपर्यंत रंगलेल्या लढतीत अनंत गीते अवघ्या अडीच हजार मतांनी विजयी झाले होते. यंदा पुन्हा एकदा अशीच अटीतटीची लढत पहायला मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

रायगड लोकसभा मतदारसंघासाठी २०१४ आणि १०१९ अटीतटीची लढत पहायला मिळाली होती. २०१४ साली शिवसेनेचे अनंत गिते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांच्यात अतिशय चुरशीची लढत पहायला मिळाली होती. शेवटच्या फेरीपर्यंत चाललेल्या या लढतीत शिवसेनेचे अनंत गिते अवघ्या अडीच हजार मतांनी विजयी झाले होते.

हेही वाचा – निकालाआधीच अलिबागमध्ये तटकरेंच्या विजयाचे फलक

२०१९ चे चित्रही फारसे वेगळे नव्हते. पुन्हा एकदा दोन प्रस्थापित नेत्यांमध्ये टोकाचा संघर्ष लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पहायला मिळाला. यावेळी देखील दोघांमध्ये चुरस पहायला मिळाली होती. दापोली, महाड, गुहागर आणि पेण मतदारसंघात शिवसेनेच्या अनंत गिते यांना मताधिक्य मिळाले होते. पण अलिबाग आणि श्रीवर्धन या दोन मतदारसंघात सुनील तटकरे यांनी निर्णायक आघाडी घेत विजय मिळवला होता. श्रीवर्धन मतदारसंघातील ३८ हजार मतांधिक्य तटकरेंसाठी महत्वपूर्ण ठरले होते.

हेही वाचा – छगन भुजबळ कोणत्या गटात आहेत? जयंत पाटील सूचक वक्तव्य करत म्हणाले, “उद्या संध्याकाळी…”

त्यामुळे मागील दोन लढती प्रमाणे यंदाही रायगडमध्ये दोन्ही नेत्यांत टोकाचा संघर्ष पहायला मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि शिवसेना उबाठा गटाचे नेते अनंत गीते यांच्यात अटीतटीचा सामना रंगण्याची चिन्हे आहेत. गेल्या पाच वर्षांत बदललेली राजकीय समिकरणे यास कारणीभूत ठरू शकणार आहेत. मुस्लिम आणि बहुजन मतांचे झालेले ध्रुवीकरण, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात झालेली फूट, यामुळे मतदारांमध्ये निर्माण झालेली नाराजी यामुळे या मतदारसंघात पुन्हा एकदा २०१४ प्रमाणे चुरस पहायला मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.