भारतीय जनता पार्टीचे नेते विनोद तावडे यांना २०१९ च्या विधानसभा निवडणुकीची उमेदवारी देण्यास पक्षाने नकार दिला होता. पक्षाने तिकीट डावलल्यानंतर विनोद तावडे महाराष्ट्राच्या राजकारणात काही दिवस अदृश्य झाले होते. पण त्यानंतर त्यांना केंद्रीय राजकारणात मोठी जबाबदारी देण्यात आली. भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस पदाची जबाबदारी तावडे यांना देण्यात आली. अलीकडेच तावडे यांनी २०२४ च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशची जबाबदारी सांभाळली.

केंद्रीय राजकारणातील विनोद तावडे यांची कामगिरी पाहता ते पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रीय होतील. विनोद तावडे हे देवेंद्र फडणवीसांना डावलून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनतील, अशी चर्चा सध्या सोशल मीडियात सुरू आहे. याबाबत प्रश्न विचारला असता विनोद तावडे यांनी स्पष्टपणे उत्तर दिलं आहे. आपल्याला महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही रस नाही. आता ‘ओन्ली राष्ट्र, नो महाराष्ट्र’ असं उत्तर विनोद तावडे यांनी दिलं. ते ‘एबीपी माझा’च्या एका मुलाखतीत बोलत होते.

ajit pawar sharad pawar (3)
“…तेव्हा शरद पवार म्हणालेले अजितला राजकारण करू द्या, मी शेती करतो”, उपमुख्यमंत्र्यांनी सांगितला १९८९ मधला प्रसंग
Udayanraje Bhosle filled the nomination form in a show of strength
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन करत उदयनराजेंनी भरला उमेदवारी अर्ज
Chief Minister Eknath Shinde
“मला रोज फोन यायचे, साहेब त्यांना काहीतरी सांगा”; शिवतारेंच्या निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितला किस्सा
internal conflict in shiv sena dispute between mp rahul shewale and mla sada saravankar
दक्षिण मध्य मुंबईत शिवसेनेत वाद; विभागप्रमुखाचा मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा सक्रिय होण्याच्या चर्चेबद्दल विचारलं असता विनोद तावडे म्हणाले, “महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा येण्याचा माझा मानस नाही. आता ‘ओन्ली राष्ट्र, नो महाराष्ट्र’. केंद्रीय स्तरावर राजकारण करताना तुम्हाला खूप शिकायला मिळतं. तुमची दृष्टी एकदम व्यापक होते. त्यामुळे मला मनापासून केंद्रातच काम करायला आवडेल,” असं उत्तर विनोद तावडेंनी दिलं.

हेही वाचा- “मी अपघाताने राजकारणात आलो”, सध्याच्या राजकीय स्थितीवर राज ठाकरेंचं भाष्य

भावी मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात तुमचा चेहरा असेल का? या सोशल मीडियावरील चर्चेबाबत विचारलं असता विनोद तावडे म्हणाले, “यामध्ये अजिबात तथ्य नाही. महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करेल. सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे यांची एक टीम आहे. हेच लोक टीम म्हणून महाराष्ट्रात काम करतील. मला महाराष्ट्रात येण्यात काहीही रस नाही, हे मी मनापासून सांगतो. मला केंद्रातल्या राजकारणातच काम करायला आवडेल.”

हेही वाचा- “…तेव्हा ‘लोकसत्ता’ माझ्यासाठी खूप मोठा होता”, राज ठाकरेंनी दिला आठवणींना उजाळा

भाजपातील अंतर्गत कुरघोडी, गटबाजी आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर असलेल्या वादाबाबत विचारलं असता तावडे म्हणाले, “यात अजिबात तथ्य नाही. भाजपात दोन गट किंवा अमुक ग्रुप, तमुक ग्रुप असं अजिबात नाही. हे मी मनापासून सांगतोय, केवळ कॅमेरा समोर आहे म्हणून बोलतोय असं नाही. भाजपाची काम करण्याची एक पद्धत आहे. त्या पद्धतीने काम सुरू आहे. त्यामुळे आम्ही सगळे मिळून भाजपा महाराष्ट्रात मजबूत कसा होईल? यासाठी काम करत आहोत.”