scorecardresearch

म्हैसाळ हत्याकांड प्रकरणी महिलेला पोलीसांकडून अटक

म्हैसाळमध्ये झालेल्या वनमोरे कुटुंबातील ९ जणांच्या हत्याकांड प्रकरणी सोलापुरातील एका महिलेला पोलीसांनी मंगळवारी अटक केली.

म्हैसाळ हत्याकांड प्रकरणी महिलेला पोलीसांकडून अटक
संग्रहित छायाचित्र

सांगली : म्हैसाळमध्ये झालेल्या वनमोरे कुटुंबातील ९ जणांच्या हत्याकांड प्रकरणी सोलापुरातील एका महिलेला पोलीसांनी आज मंगळवारी अटक केली. मुख्य संशयित असलेल्या अब्बास बागवान या मांत्रिकाची ही महिला बहिण आहे.

म्हैसाळ येथील डॉ. माणिक वनमोरे व त्यांचा भाऊ पोपट वनमोरे या दोन कुटुंबातील ९ जणांचे २० जून रोजी हत्याकांड झाले. गुप्तधन काढून देण्यासाठी मांत्रिक बागवान यांने वनमोरे कुटुंबाकडून लाखो रुपये उकळले होते. यातूनच बागवान यांने कुटुंबातील ९ जणांची विष देऊन हत्या केल्याचे तपासात समोर आले.

या गुन्ह्यात मदत केल्या प्रकरणी आज जैतूनबी उर्फ जैतूबाई महमंद हनिफ बागवान (वय ६० रा. अमन अपार्टमेंट, मुस्लिम बादशा पेठ, सोलापूर) या महिलेला अटक करण्यात आली. न्यायालयासमोर तिला हजर केले असता ११ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश मिळाले. पुढील तपास उप अधिक्षक अशोक विरकर हे करीत आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.