जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण सोहळा सुरू असताना एका महिलेनं आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण सुरू असताना बाहेर एका महिलेनं स्वत:च्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या पोलिसांनी प्रसंगावधान दाखवल्याने मोठा अनर्थ टळला आहे. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण सुरू असतानाच हा प्रकार घडल्याने पोलीस प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. या धक्कादायक प्रकारानंतर संबंधित महिलेला पोलिसांनी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात आणलं. याठिकाणी त्यांची समजूत काढल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.

हेही वाचा- बंडखोर आमदार संतोष बांगर यांना संताप अनावर; व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावली, VIDEO व्हायरल

वंदना सुनील पाटील असं आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचं नाव असून त्या जामनेर येथील रहिवाशी आहेत. जामनेर येथील एका व्यापाऱ्यानं वंदना पाटील यांच्या शेतमालाची परस्पर विक्री करत त्यांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. संबंधित फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. पण त्यांची मागणी पूर्ण न झाल्याने त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची माहिती समजत आहे.

हेही वाचा- “हात नाही तोडता आला तर…” चितावणीखोर भाषणानंतर बंडखोर आमदार प्रकाश सुर्वेंविरोधात गुन्हा दाखल

या प्रकारानंतर गुलाबराव पाटील यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. संबंधित महिलेची समस्येबाबत आपल्याला पूर्ण माहिती असून त्यांनी आरोप केलेल्या व्यापाऱ्याची यापूर्वीच चौकशी झाली आहे. संबंधित महिलेला प्रशासनाकडून काही मदत करता येईल का? याबाबत विचार केला जाईल, असं गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman attempted to torch herself during flag hoisting by gulabrao patal jalgaon rmm
First published on: 15-08-2022 at 22:53 IST