ऑनलाईन मद्य मागविणे महागात पडले ; महिलेची दीड लाख रुपयांना फसवणूक

महिलेच्या तक्रारीवरून अलिबाग पोलीस ठाण्यात अज्ञाता विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अलिबाग  : ऑनलाईन खरेदी करण्याकडे सध्या नागरिकांचा कल वाढू लागला आहे. त्यामुळे अनेक कंपन्याच्या जाहिराती ह्य वेगवेगळ्या ऑफर्स ग्राहकांसाठी आकर्षित करीत असतात. मात्र अनेकवेळा या आकर्षित ऑफरमुळे ग्राहकांवर फसवले गेल्याने डोक्यावर हात मारण्याची वेळ येते. अलिबाग मधील एका महिलेची ऑनलाईन वाइन खरेदीमध्ये १ लाख ४४ हजाराची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे या महिलेला अलिबाग पोलीस ठाण्यात धाव घ्यावी लागली आहे. महिलेच्या तक्रारीवरून अलिबाग पोलीस ठाण्यात अज्ञाता विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑनलाईन खरेदी करताना भूलथापांना बळी पडू नका. असे आवाहन अलिबाग उपविभागीय अधिकारी सोनाली कदम यांनी यानिमित्ताने केले आहे.

 अलिबागमधील फिर्यादी महिलेचे लग्न ठरले आहे. त्यामुळे हळदी समारंभाला येणाऱ्या पाहुण्यांची वाइनची सोय करण्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर पीके वाईन्सच्या पेजवर गेली. त्या पेजवर मद्याच्या आकर्षक ऑफर ठेवण्यात आल्या होत्या. त्या पेजवर ९३३५०२७३४७ या पीके वाईन्सच्या पेजवरील नंबरवर फोन करून वाईन्सची ऑर्डर बुक केली. त्यानंतर समोरील अज्ञात व्यक्तीने दिलेल्या खात्यावर ऑनलाईन पैसे पाठविण्यास सांगितले. त्याप्रमाणे फिर्यादी यांनी पैसे पाठविले मात्र पैसे भेटले नाही असे वारंवार सांगून १ लाख ४४ हजार २६ रुपये फिर्यादी यांनी ऑनलाईन पाठविले.

फिर्यादी यांनी पैसे ऑनलाईन पाठवूनही दिलेली ऑर्डर आली नाही. त्यामुळे आपण फसलो गेल्याचे महिलेला कळल्यावर अलिबाग पोलीस ठाण्यात धाव घेतली. अलिबाग पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक पाटील हे तपास करीत आहेत. ओनलाईन खरेदी करताना ग्राहकांनी पूर्ण खात्री करूनच नंतरच खरेदी करणे गरजेचे आहे असे आवाहन पोलिसांनी केलं आहे.

‘ऑनलाईन खरेदी करताना ग्राहकांनी खात्री करावी. ऑनलाईन जाहिरातीत दिलेल्या आकर्षक ऑफर दिलेली असली तरी त्यात सत्यता आहे का? हे पडताळणे महत्वाचे आहे. त्यामुळे फसवणूक होणार नाही. त्याचबरोबर आपला ओटीपी ही कोणाला देऊ नये.’

– सोनाली कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी, अलिबाग

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Woman cheated for rs 1 44 lakh while buying wine online zws

ताज्या बातम्या