किरकोळ कारणावरून महिलेस विवस्त्र करून पतीसह मारहाण

शेळी शेतात गेल्याच्या कारणास्तव महिलेला विवस्त्र करून मारहाण करण्यात आली.

प्रतिनिधिक छायाचित्र

कर्जत : श्रीगोंदे तालुक्यात शेळी शेतात गेल्याच्या कारणास्तव महिलेला विवस्त्र करून मारहाण करण्यात आली.

श्रीगोंदा तालुक्यातील भानगाव येथील विशिष्ट समाजातील एका महिलेला दि. १२ सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता शेळी शेतात गेल्याच्या कारणावरून जातीवाचक शिवीगाळ करून तिला व तिच्या पतीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत तिच्या अंगावरील कपडे ओढून महिलेला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. याप्रकरणी सदर महिलेने दि. १४ सप्टेंबर रोजी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून शेतमालक जयसिंग वागस्कर, संतोष वागस्कर, मनोहर वागस्कर, जेसीबीवाला(पूर्ण नाव माहीत नाही,सर्व रा सुरोडी, ता श्रीगोंदा) यांच्याविरोधात मारहाण करून विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे

महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की दि. १२  सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजण्याच्या  सुमारास भानगाव शिवारात सदर महिला व तिचा पती हे घराजवळील शेतात शेळी चारत असताना घराजवळील शेतमालकाने त्याच्या रानातील पिकात शेळी गेली या कारणावरून जयसिंग वागस्कर, संतोष वागस्कर, मनोहर वागस्कर, जेसीबीवाला लुटे यांनी सदर महिला व तिच्या पतीला तुम्ही आमचे काही एक करू शकत नाही असे म्हणत जातीवाचक शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी, दांडक्याने मारहाण करून अंगावरील कपडे ओढून महिलेला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले

तर  याप्रकरणी भरत वागस्कर यांनी १२ सप्टेंबर रोजी फिर्याद दिली आहे  यामध्ये म्हटले आहे की दि. १२  रोजी दुपारी तीन वाजता  भानगाव शिवारातील शेतातून दुचाकीवरून घरी येत असताना संदीप काळकुशा काळे (रा. भानगाव शिवार) हा दारू पिऊन  थांबवून पैसे दे असे म्हणून शिवीगाळ करून मारहाण करू लागला.

त्यास  विरोध करीत असताना त्याने चाकूने छातीवर, डाव्या हातावर मारहाण करून दुखापत केली. त्यावेळी चुलत भाऊ  मनोहर वागस्कर व संतोष वागस्कर यांना फोन करून बोलावून घेतले तेव्हा संदीप काळेची पत्नी तिथे आली व तिने अंगावरील कपडे काढून शिवीगाळ करत गाडीवर दगड मारून नुकसान केले अशी फिर्याद दिली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Woman with husband beaten for minor reasons in shrigonda taluka